आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून ‘एकच ध्यास, करूया अभ्यास’ मोहीम सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संत तुकाराम यांच्या ‘असाध्य तें साध्य करितां सायास कारण अभ्यास तुका म्हणे’ या उक्तिप्रमाणे शिक्षण विभागाने मोहीम सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कष्ट, अभ्यासाकरिता प्रेरित करण्याचे ठरवले आहे.
स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभ्यास मोहीम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. ‘एकच ध्यास, करूया अभ्यास’ ही मोहीम १९ फेब्रुवारी ते १४ एप्रिल असे ५५ िदवस असेल.
दोन्ही महापुरुषांना मानवंदना म्हणून शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेेचा स्तर उंचावण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मोहीम काळात अधिक श्रम घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले आहे.
१८ तास अभ्यासाचे नियोजन
१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकच ध्यास १८ तास अभ्यास कार्यक्रमाने समारोप होणार आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन, इयत्तावर अभ्यासाचे नियोजन करण्यात यावे. तिसरी ते चौथी तास, पाचवी ते सातवी तास, आठवी ते १० वी तास असा कालावधी देण्यात आला आहे.
असे आहेत उपक्रम
- शिवजयंती :प्रभात फेरी, तज्ज्ञंाचे व्याख्यान, निबंध स्पर्धा, किल्ला सहल
- समय दान:वाचन,लेखन, सोप्या गणिती क्रिया अवगत नसणाऱ्या ते बालकांचे गट करून सराव घेणे. प्रेरणा देऊन किमान वाचन, लेखन गणिती क्रिया करता याव्यात.
- पालक शाळा: रात्रीते १० काळात पालकांनी घरात अभ्यास घ्यावा.
- संवाद इंग्रजीचा: २०फेब्रुवारी ते १४ एप्रिल दरम्यान इयत्तानिहाय गरजेचा इंग्रजी संवाद आणि मुलांचा सराव करून घेणे.
- अभ्यास मंडळांना भेट : एका भागातील मुलांचे गट करून गट प्रमुखाकडून अभ्यास करून घेणे, वाचन, लेखन, पाढे इत्यादी पाठांतर
- ज्ञानी मी होणार : इयत्ते-प्रमाणे पाठ्य पुस्तका आधारित सामान्य ज्ञानाचे १०० प्रश्न देणे पाठ करून घेणे.
- गिनिज बुकात होणार नोंद : देश भक्तिपरपाच गीतांचे राज्यभर मार्चला सकाळी दहाला सादरीकरण. दोन कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंदसाठी प्रयत्न आहेत. शाळा आणि गावात आनंददायी वातावरण निर्मितीचा हा प्रयत्न आहे.

गट शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या

^‘एकचध्यास, करूया अभ्यास’ या मोहिमेबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व शाळा स्तरावर याचे नियोजन करावे. सर्व उपक्रमाकडे मुख्याध्यापक केंद्र प्रमुखाने विशेष लक्ष द्यावे.” राजेंद्रबाबर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण