आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगमर्यादा मोडणार्‍या 83 युवकांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रस्त्यावरून जाताना बेदरकारपणे गाडी चालविणे, तरुणी किंवा महिलेच्या गाडीला कट मारणे तसेच गाडी चालवत त्रास देणार्‍या 83 युवकांवर वाहतूक शाखेने शुक्रवारी दंडात्मक कारवाई केली. कारवाईच्या पहिल्या दिवशीच्या धडक मोहिमेत तरुणांच्या जड दुचाकींचे वेग नाकाबंदीच्या माध्यमातून मर्यादित करण्यात आले. वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन शाखेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. दररोज शहरातील मुख्य भागात सकाळी व संध्याकाळी ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती, वाहतूक व्यवस्थापक मोरेश्वर आत्राम यांनी दिली.

दयानंद महाविद्यालय, रंगभवन व वालचंद महाविद्यालयाजवळ रस्त्यावर नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली.या वेळी विशेष पथकाने वेगाने येणार्‍या गाड्यांवर,गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, तसेच युवतींना त्रास देणार्‍या युवकांवर कारवाई केली.

महिलांनी पुढे येणे गरजेचे
छेडछाडीचे अनेक प्रकार घडत असले तरी त्यांना वाचा फोडण्यासाठी महिलांनी व युवतींनी पुढाकार घ्यावा. जोपर्यंत त्या पुढे येत नाहीत तोपर्यंत कडक करावाई करणे शक्य नाही. एखादी घटना घडल्यास तरुणींनी तक्रार करावी. तत्काळ कारवाई करावी. मोरेश्वर आत्राम - उपायुक्त, वाहतूक शाखा

स्पीड गनचा केला वापर
सोलापूर वाहतूक शाखेकडे नाकाबंदीच्या काळात वापरण्यात येणार्‍या स्पीड गनचा तुटवडा आहे. एकाच स्पीड गनच्या साहाय्याने शुक्रवारी काम करण्यात आले. यावेळी ज्या तरुणांना कॅच करणे अवघड गेले अशांना पोलिस हवालदारांनी पाठलाग करून ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली.