आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spend 11 Lakh 79 Thousand Per Month For Lifting The Garbage

कोट्यवधींचा खर्च, तरीही कचरामुक्त शहर स्वप्नच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- समिक्षा कंपनीचा मक्ता रद्द केल्यानंतर महापालिकेने सध्या चार मक्तेदार आणि घंटागाड्यांची वेगळी रचना लावली. रोज शहरातून सुमारे २५० टन कचरा उचलला जात आहे. या कामासाठी प्रतिमहा ६६ लाख ६० हजार रुपये खर्च केला जात असल्याची नोंद महापालिकेच्या सफाई विभागात आहे. इतकी मोठी रक्कम खर्च होत असताना नियोजनशून्य कारभारामुळे शहरात जागोजागी कचरा साठल्याचे दिसत आहे.
टनाला ६०० प्रमाणे मक्तेदारांवर महिन्याला ४५ लाख रुपये खर्च
कचरा उचलण्यासाठी महापालिकेने मानवे, काटकर, शिंदे, पटेल या चौघांना मक्ता दिला. त्यांना प्रति टन ६०० रुपये प्रमाणे मक्ता दिला आहे. कचरा उचलून डेपोमध्ये नेणे आणि घंटागाडीच्या माध्यमातून उचलण्यात आलेला कचरा हा डेपोत पोहोच करणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. राेज दीड लाख रुपयेप्रमाणे महिन्याला ४५ लाख रुपये यावर खर्च केला जात आहे.
महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा
महापालिकेच्या मालकीचे १२ कॉम्पॅक्टर, डम्पर, ट्रक अशी वाहने वापरून दिवसा सुमारे ३५ टन कचरा उचलला जातो. या वाहनांचा डिझेल खर्च आणि दिवसाच्या पगाराचा हिशोब केला असता दिवसा ३२ हजार ७०३ तर प्रतिमहा लाख ८१ हजार ९० रुपये खर्च होतो.
महापालिकेच्या मालकीचे १२ कॉम्पॅक्टर, डम्पर, ट्रक अशी वाहने वापरून दिवसा सुमारे ३५ टन कचरा उचलला जातो. नव्याने आणलेल्या एका घंटागाडीतून एका खेपेस ४०० किलो कचरा उचलला जातो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घंटागाड्यांवर सध्या दरमहा किती होतो खर्च...