आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Ground News In Marathi, Furnished Ground Issur At Solapur, Divya Marathi

सोलापुरातही प्रकाश झोतातील क्रीडा सामन्यांसाठी सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने सोडली तर मुंबईच्या पोलिस जिमखाना मैदानानंतर दिवस-रात्र क्रिकेट खेळण्याची सुविधा असणारे सुसज्ज मैदान आता सोलापुरात बनले आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानावर लख्ख प्रकाशझोतात सामने खेळवण्याची सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध झाली आहे. छाया. रामदास काटकर

दोन वर्षे लागली
महिन्यांपासून मैदान कार्यान्वित. काम पूर्ण होण्यास लागली 2 वर्षे. या स्पर्धा घेता येतील
या मैदानावर क्रिकेटच्या सामन्यांशिवाय कबड्डी, खो-खो, फुटबॉल, मैदानी स्पर्धाही दिवस-रात्र पद्धतीने आयोजित होतील.

यांनी केले प्रयत्न
तत्कालीन रेल्वे व्यवस्थापक ए. के. प्रसाद, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक सुशील गायकवाड, रेल्वे क्रीडा अधिकारी संतोष परगे आणि ए. के. वर्मा.

मैदान रात्री हवे असल्यास प्रति तास 1200 रुपये अधिक दोन हजार रुपये मैदान भाडे असेल.

पुढील टप्प्यात संपूर्ण मैदानावर हिरवळीचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
800 वॅटचा एक दिवा
30 खेळाडूंसाठी खास हॉस्टेल सुविधा
65 यार्डचे विस्तीर्ण मैदान आहे
36 लाख टॉवर्ससाठी एकूण खर्च
06 प्रखर विद्युत झोताचे टॉवर
10 दिवे एका टॉवरमध्ये
16 मीटर प्रत्येक टॉवरची उंची
06 लाख रुपये प्रत्येक टॉवरसाठी खर्च