आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports Badminton Hall Taluka Office Of Inauguration

पंढरीत बॅडमिंटन हॉलचे नामकरण, मात्र क्रीडा कार्यालय अनभिज्ञ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- येथील तालुका क्रीडा कार्यालयाच्या आवारातील बॅडमिंटन हॉलला श्री संत रोहिदास तालुका क्रीडा संकुल असा फलक लावून अचानकपणे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नामकरणाचा हा कार्यक्रम कधी झाला, कोणाच्या हस्ते, कोणाच्या परवानगीने पार पडला आदी प्रश्न गुलदस्त्यातच आहेत.
या बाबत क्रीडा अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांना याची साधी कल्पना नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नामकरणाचा हा घाट नेमका कुणी आणि कुणाच्या परवानगीने घातला हा संशोधनाचा विषय बनला आहे. येथील गोपाळपूर रोडलगत महाराष्ट्र शासनाचे क्रीडा युवक सेवा संचालनालयाचे पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयालगतच बॅडमिंटन हॉल आहे. यात काही शासकीय अधिकारी, नागरिक, विद्यार्थी दररोज बॅडमिंटन खेळतात. त्याच्या वरील बाजूस अचानकपणे श्री संत रोहिदास तालुका क्रीडा संकुल असा फलक लावला आहे. तालुका क्रीडा कार्यालयाकडून असा कोणताही नामकरण कार्यक्रम झालेला नाही. जर तालुका क्रीडा कार्यालयाकडून हा नामकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला नाही. तर या हॉलचे नामकरण नेमके कुणी केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे संबंधित याविषयी अनभिज्ञ आहेत.
काहीही माहिती नाही-
याप्रकाराबद्दल मला काही माहिती नाही. असा कोणताही कार्यक्रम झालेला नाही. या संदर्भात तालुका क्रीडा अधिकाऱ्यांशी बोलून योग्य ती माहिती घेऊन त्यांना उचित कारवाईचे आदेश देतो.'' गजाननगुरव, तहसीलदार तथा तालुका क्रीडा समिती प्रमुख
योग्य कारवाई करू-
तालुका क्रीडाअधिकारी पद हे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या अनिल देशपांडे हे प्रभारी आहेत. नामकरणाचा कोणताही कार्यक्रम झालेला नाही. याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू.'' भाग्यश्रीबिले, जिल्हा क्रीडा अधिकारी