आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sriviththala Rukmini Temple In Pandharpur Committee

गरिबांच्या विठ्ठलाची पूजा 51 हजारांमध्ये, 19 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य भक्तांनाही संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- ‘गरिबांचा कनवाळू’ विठुरायांची दैनंदिन नित्यपूजा 19 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुली होणार आहे. 51 हजार रुपये देणगी शुल्क घेऊन 19 फेब्रुवारीपासून इच्छुक भाविकांच्या हस्ते पूजा करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली.
विठ्ठलाची नित्यपूजेच्या वेळी त्या दिवशी दर्शन रांगेतील भाविकांपैकी एका भाविक पती-पत्नीला इच्छुक पूजेसाठी देणगीदारासोबत पूजेचा मान देण्यात येणार आहे. यापूर्वी तीन ते वर्षापूर्वी मंदिर समितीने नाममात्र देणगी शुल्क आकारून श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाचा घाट घातला होता. त्यासाठी वेगळी रांग करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यास वारकरी व भाविकांमधून तीव्र विरोध झाल्याने तो स्थगित करावा लागला होता.
शुल्क आवाक्याबाहेर
सर्वसामान्य विठ्ठलभक्तांसाठी नित्यपूजा खुली केल्याच्या नावाखाली आकारलेले ५१ हजारांचे शुल्क सर्वसामान्य भक्तांच्या आवाक्याबाहेरचे तर आहेच, शिवाय विठुरायाच्या शिकवणीच्याही विरुद्ध आहे. त्यामुळे भक्तांना हा निर्णय किती भावतो, हे पाहणे महत्वाचे आहे.