आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - जिल्ह्यातील अकरावीच्या जागांच्या तुलनेत दहावी उत्तीर्ण होणार्यांची संख्या कमी आहे. सर्वांना प्रवेश मिळू शकेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाची चिंता नाही! दहावी परीक्षेत 67 हजार 660 विद्यार्थी बसले होत. त्यापैकी 47 हजार 460 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीसाठी जिल्ह्यात 51 हजार 800 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्यासाठी महाविद्यालयनिहाय एकच वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 11 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सुतार आणि शिवाजी चंदनशिवे यांनी पत्रकारांना दिली.
मॅनेजमेंट कोटा 20 टक्के
उपलब्ध जागेच्या 20 टक्के जागा मॅनेजमेंट कोट्यातून भराव्यात असा शासनाचा नियम आहे. त्यामुळे महाविद्यालयास तसा अधिकार राहणार आहे. याशिवाय शिक्षण अधिकार्यांमार्फत प्रत्येक तुकडीस पाच जागा वाढवून त्या त्यांच्यामार्फत भरल्या जाणार आहेत.
अशा आहेत जागा
कला विज्ञान वाणिज्य संयुक्त एकूण
शहर 5640 4480 3320 400 13840
ग्रामीण 22400 11440 2520 1600 37960
एकूण 28040 15920 5840 2000 51800
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक
11 ते 19 जून : नेटवरील गुणपत्रिकानुसार अर्ज वाटप
15 ते 19 जून : भरलेले अर्ज स्वीकारणे सुरू
20 ते 23 जून : अर्ज छाननी प्रक्रिया
24 जून : प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार
24 ते 26 जून : गुणवत्ता यादीनुसार प्रवेश सुरू
27 जून : दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार
27 ते 28 जून : गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
29 जून : तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार
2 जुलै : अखेर प्रवेश
3 जुलै : महाविद्यालये होणार सुरू
सोमवारी प्राचार्यांची बैठक
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत आढावा आणि माहिती देण्यासाठी प्राचार्यांची बैठक सोमवारी दुपारी 12 वाजता संगमेश्वर महाविद्यालय येथे होणार आहे. तरी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विद्यार्थ्यांपेक्षा जागा जास्त
जिल्ह्यात 47 हजार 460 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उपलब्ध जागा 51 हजार 800 आहेत. त्यामुळे सुमारे साडेचार हजार जागा अतिरिक्त असल्याने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. विज्ञान शाखेसाठी काही अडचणी आल्या तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पण, त्यांच्या आवडीचे महाविद्यालय मिळणार नाही, अशी माहिती साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सुतार यांनी दिली.
श्रेणीनुसार उत्तीर्ण
विशेष प्रावीण्य 8,943
प्रथम श्रेणी 17,534
द्वितीय श्रेणी 17,162
उत्तीर्ण श्रेणी 3,821
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.