आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या दिमतीला 571 एसटी, एसटी महामंडळाला मिळणार सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मतदानप्रक्रियेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने मागणीनुसार 571 एसटी निवडणूक आयोगाच्या दिमतीला दिल्या आहेत. मतदानाचे साहित्य कर्मचारी यांना घेऊन काही गाड्यांनी मंगळवारीच मतदान केंद्र गाठले आहे. बुधवारीदेखील काही गाड्या मतदानकेंद्रावर जाणार आहेत. 571गाड्यांच्या वापरापोटी निवडणूक आयोग एसटी प्रशासनाला सुमारे सव्वा कोटी रुपयांचे भाडे देणार आहे.
कमीवर्दळ असणाऱ्या मार्गावरील काही गाड्या रद्द
तब्बल 571 गाड्या दिल्याने कमी वर्दळ असणा-या मार्गावरच्या काही गाड्या सुरू ठेवून, काही गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच मतदान केंद्रावरून गाड्या परतताना थेट सोलापूरला आणता मतदान केंद्रापासून जवळ असणाऱ्या बसस्थानकावरून त्या सोलापूरला आणण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांनी संबंधित आगाराच्या आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. त्यामुळे परतणाऱ्या प्रवाशांची काही प्रमाणात सोय होणार आहे. मतदानाचे साहित्य आपापल्या केंद्रावर घेऊन जाताना मतदान केंद्र कर्मचारी. निवडणुकीच्या कामांना प्राधान्य देत 571 गाड्या मतदानासाठी देण्यात आल्या आहेत. यामुळे काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देखील प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची आम्ही दक्षता घेतली आहे श्रीनिवासजोशी, विभागनियंत्रक, सोलापूर विभाग.