आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटीचे विधी अधिकारी मराठेंना लाच घेताना अटक; 4 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्य परिवहन (एसटी) प्रशासनाविरुद्धच्या खटल्यात तक्रारदार कर्मचार्‍याच्या बाजूने निकाल देण्यासाठी 4 हजारांची लाच घेताना सोलापूर विभागातील विधी अधिकारी दिलीप पंढरीनाथ मराठे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी रंगेहाथ पकडले.

तक्रारदार पंढरपूर आगार येथे वाहक म्हणून सेवेत असताना त्यांच्यावर अफरातफरीची केस झाली होती. त्यावरून त्यांना एसटी विभागाने बडतर्फ का करू नये, अशी नोटीस दिली होती. या नोटिसीविरोधात तक्रारदाराने सोलापूर कामगार न्यायालयात अपिल केले होते. अपिलामध्ये परिवहनचे विधी अधिकारी दिलीप मराठे यांनी तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती. त्यानुसार मराठे यांनी मागितलेल्या लाचेच्या रकमेबाबत पडताळणी करून बुधवारी (दि. 25) कामगार न्यायालयातील विधिज्ञ कक्षात लाच घेऊन येण्यास सांगितले होते. त्यावेळी मराठे यांना पकडण्यात आले. लाचलुचपत कायद्यान्वये जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
(फोटो - दिलीप मराठे)