आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Staff Members Declare Asset, If Not Then Salary Stopped

कर्मचार्‍यांनो संपत्ती जाहीर करा, अन्यथा 1 ऑक्टोबरपासून वेतन बंद!- आयुक्त गुडेवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका आस्थापनावरील ‘ड’ श्रेणीतील कर्मचारी वगळता अन्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपली संपत्ती व दायित्त्व यासंबंधीचे विवरण 30 सप्टेंबरच्या आत जाहीर करावे, असा आदेश महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मंगळवारी काढला. हे न केल्यास 1 ऑक्टोबरपासून वेतन आणि भत्ते बंद करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

महापालिकेत 1980 नंतर सेवेत आलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना संपत्ती जाहीर करणे आवश्यक आहे. कर्मचार्‍यांनी सेवेत रुजू झाल्यापासून आजतागायत मिळवलेली संपत्ती 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करायची आहे. नजीकच्या काळातील संपत्ती 31 जुलैच्या आत सादर करावी, असे आदेशही गुडेवार यांनी दिले आहेत. संपत्ती जाहीर न करणार्‍या कर्मचार्‍यांवर गैरवर्तनाचा आरोप ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

संपत्तीची माहिती वेबसाइटवर टाकणार का?
लोकप्रतिनिधीची माहिती निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मनपा अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संपत्ती आणि त्यांचे दायित्त्वाची माहिती मागवली; पण ती आल्यावर महापालिकेच्या वेबसाइटवर टाकणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांनी सांगावे
महापालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांची माहिती आयुक्तांनी मागितली असली तरी मनपा कर्मचार्‍यांच्या ज्ञात आणि अज्ञात माहिती असेल तर ते आयुक्तांना कळवावी, असेही आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.
माहिती मागवली आहे
महापालिका कर्मचार्‍यांनी आपली संपत्तीची माहिती देणे बंधनकारक आहे, त्यामुळे तसे आदेश दिले. शासनाकडून आलेल्या अधिकार्‍यांची मालमत्ता मागण्याचा अधिकार मला नाही. मनपा कर्मचारी संपत्ती आमच्याकडे देतील. ती बेवसाइटवर टाकण्याबाबत विचार करू.’’ चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त
हे आहेत महत्त्वाचे अधिकारी
नगर अभियंता सुभाष सावस्कर, उपअभियंता विजय राठोड, गंगाधर दुलंगे, मोहन कांबळे, नगर रचना अधिकारी झेड. एम. नाईकवाडी, बांधकाम परवाना विभाग प्रमुख दीपक भादुले, आरोग्याधिकारी डॉ. जयंती आडकी, जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे, नगरसचिव ए. ए. पठाण, सर्व झोन अधिकारी आणि अभियंते.

कर्मचार्‍यांची वर्गवारी अशी
एकूण - 1383
क-1164
ब-190
अ - 29