आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रांक विक्रेत्यांचा संप, व्यवहार झाले ठप्प, जिल्ह्यातील 600 विक्रेत्यांचा आहे सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एकहजार रुपयांपेक्षा अधिक मुद्रांकाची विक्री, वितरण आणि छपाई बंद केल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक मुद्रांक विक्रेत्यांनी शासनाविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी शहर काही तालुके वगळता इतर तालुक्यांत दस्त नोंदणी करण्यात आली. बहुतांश ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या पर्यायी व्यवस्थेचा वापर केला नाही असे स्पष्ट झाले. संपाच्या पहिल्या दिवशी काही ठिकाणी दस्त नोंदणीवर परिणाम झाला तरी गुरुवारी शुक्रवारी दस्त नोंदणी होतील, अशी अपेक्षा मुद्रांक जिल्हाधिकारी मंजूषा मिस्कर यांनी व्यक्त केली.
तालुका निहाय झालेले दस्त-
सांगोला१७, पंढरपूर १२, माळशिरस २, करमाळा ६,अक्कलकोट २, दक्षिण सोलापूर, बार्शी, माढा वैराग असे एकूण ४३ दस्त नोंदणी बुधवारी झाले आहेत. यातून लाख ९४ हजार ४०० रुपयांचे आॅनलाइन ई-पेमेंट करण्यात आले तर यातून लाख ४८ हजार ९०० रुपयांचे नोंदणी शुल्क मिळाले आहे. रोज सर्वाधिक गर्दी असलेल्या उत्तर सोलापूर आणि २, अकलूज, मंगळवेढा मोहोळ या कार्यालयात एकही दस्त नोंदणी झाली नाही.
शहरातील नोंदणी कार्यालयाकडे दस्त नोंदणीच नाही
शहरातदक्षिण साेलापूर, उत्तर सोलापूर शहरासाठी असे तीन स्वतंत्र खरेदी-विक्री करण्याची कार्यालये आहेत. या तीनही कार्यालयांकडे बुधवारी एकही पक्षकार वा नागरिक फिरकला नाही. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात दस्त नोंदणी झाल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनाच्या पर्यायी व्यवस्थेचा शहरात एकही नागरिकाने लाभ घेतला नाही. निबंधक कार्यालयात ठेवलेले फ्रँकिंग मशीन हे शोभेसाठी राहिल्याचे दिसून आले.
मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्या
1.शासनाने काढलेला आदेश हा मुद्रांक विक्रेत्यांचा विश्वासघात आहे. मुद्रांक विक्रेत्यांच्या कोणत्याही संघटनेला विश्वासात घेता आदेश काढण्यात आला आहे. यामुळे राज्यातील १० हजारपेक्षा अधिक तर जिल्ह्यातील ६०० कुटुंबांची उपासमार होणार आहे.
2. एका मुद्रांक विक्रेत्याला प्रतीदिन ३० हजार रुपयांचे मुद्रांक विक्री करण्याची मर्यादा होती. ही मर्यादा कायम ठेवावी, मुद्रांक विक्रेत्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशा दोन प्रमुख मागण्या अाहेत.
3. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन वडगावकर, सचिव रमेश गंगणे, गणेश आरकाल, जे. के. शेख, प्रताप सूर्यवंशी, दिलीप देशपांडे, सुनील पोतदार, जयंत कुलकर्णी, विश्राम भालेराव, विठ्ठल जोकारे, हारून शेख आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. मुद्रांक विक्रेत्यांनी पुकारलेल्या संपामुळे सोलापूर दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट होता.