आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार प्रचारकांशिवाय किल्ला लढताहेत काँग्रेसचे उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधानसभानिवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. पण, जिल्ह्यात काँग्रेसचा अद्याप एकही स्टार प्रचारक फिरकला नसल्याने सर्व 11 उमेदवारांना स्वत:लाच प्रचाराचा किल्ला लढवावा लागतोय. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश केंद्रीय कमिटीने सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रचारांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
जिल्हा शहर काँग्रेस कमिटीने स्टार प्रचारकांच्या नावांची मोठी यादी पक्षाच्या प्रचार समितीकडे पाठवली. पण, त्यांच्याकडून प्रतिसादच मिळाला नसल्याने उमेदवारांना चांगलाच घाम सुटलाय.
काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपचे अनेक दिग्गज नेतेमंडळी जिल्ह्यात प्रचाराचा धुराळा उडवला आहे. त्या तुलनेत काँग्रेसची प्रचार यंत्रणा शांत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे उमदेवार स्वत:च्या प्रचाराचे मैदान लढवत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही शहर मध्य मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले. काँग्रेसच्या नेतेमंडळींचे प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य मतदारसंघातील प्रचारावर लक्ष आहे. काँग्रेस भवनातील सूचना फलकांवरही फक्त शहर मध्य मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन लिहिण्यात येते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे सोलापुरातील प्रचार सभेचे नियोजन अद्याप ठरले नाही.
^राज्यासह केंद्रातील स्टार प्रचारकांची टीम सोलापुरात येणार आहे. त्याबाबतचे िनयोजन झाले असून, १० ऑक्टोबरला नारायण राणेंची सभा पूर्वभागात आहे. तसेच, ज्योतीरादित्य शिंदे यांची ११ ऑक्टोबरला सभा असून, इतर नेत्यांच्याही लवकरच सभा होतील. प्रकाशयलगुलवार, शहराध्यक्ष,काँग्रेस कमिटी
कुटुंब रंगलेय प्रचारात
सोलापूरदक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार मानेंच्या प्रचारासाठी पत्नी जयश्री, मुलगा पृथ्वीराज, भाऊ जयकुमार बाळासाहेब माने प्रचारात आहेत. शहर उत्तरमध्ये माजी आमदार विश्वनाथ चाकोतेंच्या प्रचारात पत्नी सुप्रिया, भाऊ महादेव सिद्धाराम, मुलगा युवराज-विश्वराज, पुतणे उदयशंकर चाकोते. अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंच्या प्रचारासाठी वडील सातलिंगप्पा म्हेत्रे, पत्नी सुवर्णा, मुलगा शिवराज, भाऊ शंकर म्हेत्रे प्रचारात सक्रीय आहेत.