आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Assembly Monsoon Session Start Solapur Issue

नुस्ती चर्चा की मिळणार ठोस आश्वासन; सोलापुरातील आमदार फोडणार वाचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 13 आमदार त्यात आपापले प्रश्न मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत; मात्र ते प्रश्न नेहमीचेच आहेत. गेल्यावेळच्या अधिवेशनात महापालिकेतील अधिकार्‍यांच्या रिक्त जागा भरण्यांचे, एसबीसी, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क देण्याचे, शहरातील वाहतुकीवर व एकूणच दळणवळणावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचे अशा अनेक प्रश्नांवर सरकारने ते पूर्ण करण्याचे आश्वासने दिलेली होती. आता पुन्हा चार महिन्यांच्या कालावधीनंतर अधिवेशन होत आहे. पण, प्रश्नेन आजही तसेच आहेत. याही अधिवेशनात पुन्हा त्यावरच चर्चा होणार आहे. पण, तीच आश्वासने मिळणार की ठोस काही होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता ढोबळेंचे प्रश्न, सोपलांची असणार उत्तरे
नूतन पाणीपुरवठा व पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी हे अधिवेशन मंत्री या नात्याने पहिलेच आहे. तसे ते जुने जाणकार आहेतच. हजरजबाबीपणा आणि मिश्किल यासाठी त्यांची ख्याती आहे. मागील अधिवेशनात ते प्रश्नेन उपस्थित करणारे आमदार होते. त्यांना उत्तरे लक्ष्मण ढोबळे यांनी मंत्री म्हणून दिली. आता दोहोंच्या भूमिकेत बदल झाला आहे. र्शी. ढोबळे आता प्रश्न उपस्थित करतील तर मंत्री असेलेल र्शी. सोपल उत्तरे देतील.

मंगळवेढा तालुकाचा प्रश्न मांडला आहे - विजयसिंह मोहिते पाटील (विधान परिषद)
>मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त अशा 35 गावांच्या पाणीसमस्या सुटलेली नाही. त्याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.
>वाघोली (ता. माळशिरस) व कान्हापुरी (ता. माढा) या दोन गावांदरम्यान भीमा नदीवर पूल बांधण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. त्यासाठी जाब विचारणार आहोत.
>सातारा जिल्ह्यातील धोमलकवडी धरणाचे पाणी माळशिरसमधील गावांना मिळावे.
> करमाळा तालुक्यातील निमगाव येथील धरणग्रस्तांना न्याय मिळावा.
> माळशिरस येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारती बांधणी संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी पाठवलेल्या प्रस्तावाबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला यासंदर्भात विचारून ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

>पालखी मार्गाचे चौपदीकरण, नातेपुते येथील सुधारित पाणीपुरवठा योजने संदर्भातही प्रश्न उपस्थित करणार आहेत.
>खुडूस येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे. तसेच अधिवेशनकाळात अन्य विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन- डॉ. हनुमंत डोळस(माळशिरस)
>प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गतवर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन फसले. यावेळी उजनीचे नियोजन कसे असेल?
>उन्हाळी हंगामात नीरा कालव्यातून माळशिरस तालुक्याला शेवटचे आवर्तन मिळाले नाही, याचाही जाब आपण विचारणार.
>जिल्ह्यातील ठिबक सिंचन घोटाळ्यासंदर्भात मी व दौंडचे आमदार रमेश थोरात आणि शिरूरचे आमदार अशोक पवार तिघांनी मिळून लक्षवेधी उपस्थित केली आहे.
>फळबाग अनुदान घोटाळा, वीजसमस्या, रस्त्यांची दुरवस्था अशा विविध समस्यांचे सुमारे 50 प्रश्न आपण टाकले आहेत.

जुळे सोलापुरातील रस्त्यांची कामे
>एमएसआरडीसीअंतर्गत जुळे सोलापुरातील रस्त्याची काम रखडली आहेत.
>सीना-भीमा नदी धरण्यात वारंवार अडचणी निर्माण होतात. त्यातील सर्व तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करावी.
>महादेव कोळी समाजाचे आंदोलन चालू आहे. त्यांच्या प्रश्नेनावर योग्य तोडगा काढावा.

अनेक प्रश्नांवर लक्षवेधी
प्रत्येक अधिवेशन काळात 100 ते 200 प्रश्न, दहा ते पंधरा लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न आमदार या नात्याने करते. या पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारी प्रारंभ होईल. त्यात यावेळीही विविध प्रश्नेने आणि लक्षवेधी अधिवेशन काळात असणार आहेत. हे पावसाळी अधिवेशन यशस्वी होईल. विरोधकांना विरोध करण्यासाठीही मुद्दे नाहीत, मी मागील अधिवेशनात जी विविध प्रश्ने मांडली, लक्षवेधी मांडली त्याचा निश्चित असा उपयोग झाला. तो होतोच. अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली तर काही प्रगतिपथावर आहेत. लक्षवेधी, पुरवणी प्रश्नेन उपयुक्त ठरतात.’’ प्रणिती शिंदे , शहर मध्य मतदारसंघ