आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Give Permission For New Over Bridge In Solapur

सात रस्ता ते जुना पूना नाका उड्डाणपुलास राज्याची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात उड्डाणपूल करण्यात येणार आहे. उड्डाणपुलासाठी मोठी रक्कम लागणार आहे. राज्याऐवजी केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. त्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.
शहरात उड्डाणपूल बांधण्यास राज्याच्या रस्ते विकास महामंडळाच्या संचालक मंडळात २७ मार्च रोजी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरात उड्डाणपूल होण्यास राज्याची आडकाठी येणार नाही.

सरकारने मेल कन्सल्टंट

शहरातील उड्डाणपुलास शासनाने मान्यता दिली. पण त्यांचा सविस्तर आराखडा तयार करून केंद्राकडे सादर करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमणार आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यावर केंद्राकडून पुढील प्रक्रिया होईल.

गडकरींकडून आश्वासन
सोलापुरात उड्डाणपुलास निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार राज्याकडून केंद्राकडे प्रस्ताव दिल्यानंतर गडकरी निधी मंजूर करतील. त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे.

हाच रस्ता का?

उड्डाणपूल बांधण्यासाठी मोठ्या रक्कम लागणार आहे. ती राज्य सरकारकडून मिळणे कठीण आहे. केंद्र सरकारकडून मिळू शकते. रंगभवन ते जुना पूना नाका हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गासाठी केंद्र निधी देऊ शकतो. त्यामुळे हा रस्ता निवडला. या रस्त्याचा सर्व्हे पुढील काळात करण्यात येणार आहे. त्यानुसार पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे प्रयत्नशील आहेत.

असा असेल मार्ग

सातरस्ता, रंगभवन, डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, अण्णा भाऊ साठे चौक (भय्या चौक), मेकॅनिकी चौक, शिवाजी चौक, जुना पूना नाका. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वाहतुकीची कोंडी नित्याची आहे.

या मार्गावरील वाढत्या वाहतुकीची समस्या सुटू शकेल

शिवाजी चौक
सोलापूर‑ पुणे हायवे
जुना पूना नाका
मेकॅिनकी चौक
अणाभाऊ साठे चौक
रेल्वेस्टेशन चौक
डफरीन चौक
रंगभवन
विजापूर रस्ता
दीर्घकालीन योजना आणण्यासाठी प्रयत्न
शहरात उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निधी देणार आहेत. त्यामुळे प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात येईल. उड्डाणपुलास एमएसआरडीसी संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. सुमारे ३८० कोटींचा प्रकल्प आहे.” विजयकुमार देशमुख, पालकमंत्री