आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stay Alert Citizens About The Environment Guardian Minister Deshmukh

पर्यावरणाबद्दल नागरिकांनी जागृत रहावे, पालकमंत्री देशमुख यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जागतिक तापमान वाढत आहे हे वाढते तापमान मानव सृष्टीसाठी धोकदायक आहे या वाढत्या तापमानाचा प्रत्येकाने विचार करावा त्याचबरोबर वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील हा धोका नागरिकांनी ओळखून पर्यावरणाबद्दल सतर्क रहावे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या स्मरणार्थ दि. ते जून २०१५ या कालावधीत पर्यावरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त वृक्षारोपण जनजागृती कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते.
ते म्हणाले की, केवळ झाडे लावून चालणार नाही तर लावण्यात आलेली ती झाडे वाढावीत, जगावीत, यासाठी प्रत्येकाने मन:पूर्वक प्रयत्न करावा तसेच वृक्षलागवडीसाठी लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे सांगून ना. देशमुख म्हणाले की, आवश्यकता भासल्यास वृक्ष लागवडीसाठी डीपीडीसीमधून काही निधी देण्याबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर वृक्ष लागवडीसाठी नक्षत्र झाडे देण्यासाठी प्रयत्न करू. वृक्षारोपणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, आ. सुभाष देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी, उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, प्रांताधिकारी शहाजी पवार यांनीही वृक्षारोपण केले.या कार्यक्रमासाठी उत्तरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, पक्षीमित्र बी.एस.कुलकर्णी, मानद वन्य जीवरक्षक डॉ. निनाद शहा, वृक्षमित्र बाबूराव पेठकर, रवींद्र माने, व्ही. व्ही. परळकर, श्रीमती झोळ मॅडम, प्रवीण टिळे, भरत छेडा यांच्यासह वन विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वनविभाग जिल्ह्यात १० लाख रोपे लावणार
प्रतापनगर(सोलापूर) याठिकाणी असलेला हा सिध्देश्वर वनविहाराचा सुमारे १८५ हेक्टरइतका परिसर निसर्गप्रेमींसाठी महत्त्चाचे स्थळ ठरेल असा आशावादही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी वन विभागाचे उपवनसंरक्षक सु.बा.बडवे यांनी जिल्ह्यात सुमारे ८२५ हेक्टरइतक्या क्षेत्रावर अंदाजे १० लाख रोपे वनविभागातर्फे लावण्यात येतील, असे प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी वन विभागातील अडीच एकर क्षेत्रावर लावण्यात आलेल्या विविध प्रजातीच्या सुमारे ११०० झाडांची तसेच त्याठिकाणी वन्य प्राणी, पक्ष्यांसाठी बांधण्यात आलेल्या तलावाची पाहणी केली.