आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्थायी’साठी नव्या आठ सदस्यांची झाली निवड, सभापती निवड मार्चमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर| महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नावे महापौर सुशीला आबुटे यांनी बुधवारी जाहीर केली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे या वेळी दिसून आले. नवीन सभापती निवड मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

महापालिकेची फेब्रुवारीची सभा बुधवारी झाली. प्रशासनाकडून दोन तातडीचे विषय दाखल करण्यात आले. त्यात पाणीपुरवठा सुधारणेसाठी १२ महिने उपशासाठी एकरूख येथे कायमस्वरूपी पंप बसवणे, निधी आवश्यक असल्याने धोरणात्मक निर्णय सभागृहापुढे विषय दाखल करण्यात आले.

काँग्रेसचे पक्षनेते संजय हेमगड्डी, राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे, भाजपचे पांडुरंग दिड्डी, माकपचे माशप्पा विटे यांनी महापौरांकडे बंद पाकीट दिले. महापौरांच्या परवानगीने नगरसचिव ए. ए. पठाण यांनी नावे जाहीर केली.

नवे सदस्य

कॉंग्रेस: रियाजहुंडेकरी, अनिल पल्ली, अनिता म्हेत्रे, विनोद गायकवाड, राष्ट्रवादी: शांतादुधाळ, पीरअहमद शेख, भाजप: चंद्रकांत रमणशेट्टी, बसप: आनंद चंदनशिवे