आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज फैसला : स्थायी खजिन्यासाठी पक्षनेत्यांचा कस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या आठ नव्या सदस्यांच्या नावे जाहीर होणार आहेत. मनपाच्या तिजोरीची चावी असणाऱ्या या समितीवर आपली वर्णी लागावी याकरिता इच्छुक नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे.
महापालिकेची आताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यासू नगरसेवकांना संधी देण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे. तर दुसरीकडे मागील तीन वर्षात कोणतेही पद मिळाले नाही अशांना संधी देण्याचा विचार पक्ष करत असल्याचे दिसून येते.
स्थायी समितीत काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी दोन आणि भाजप, बसप-माकपचे प्रत्येकी एक अशा आठ सदस्यांची निवड होणार आहे.स्थायी समिती महत्त्वाचे निर्णय येथे घेतले जातात. मुख्य लेखापरीक्षक मुख्य लेखापाल हे दोन महत्त्वाचे आर्थिक नाडी सांभाळणारे विभाग स्थायी समितीशी निगडित आहेत. त्यामुळे या समितीमध्ये संधी मिळण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस दिसते. सदस्य निवडीचे अधिकार राजकीय पक्षांना असते.

माहिती असणाऱ्यांचा अाग्रह

स्थायीत आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे तेथे जाणारे सदस्य माहिती असलेले हवेत. तसा आग्रह पक्षाकडे धरणार असल्याचे नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी सांगितले.
^स्थायीत महत्वाचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे स्थायीत जाणारा सदस्य शिक्षित लोकहिताचा निर्णय घेणारा असावा. त्यांना शहराची जाण असली पाहिजे. याशिवाय प्रशासन स्थायी यांच्यात समन्वय साधून जाणारा सदस्य असावा. ऋतुराजबुवा, राज्यशास्त्राचे अभ्यासक
यांची संपली मुदत
काँग्रेस : चेतननरोटे, दत्तू बंदपट्टे (पुरस्कृत), नागेश ताकमोगे, उदय चाकोते.
राष्ट्रवादी: गीतामामड्याल, इब्राहिम कुरेशी
भाजप: शिवानंदपाटील
बसप: आनंदचंदनशिवे

प्रशासनाविरुद्ध ‘स्थायी’चा संघर्ष
चालूआर्थिक वर्षात स्थायीतील निर्णय पाहता, आयुक्त विरुद्ध स्थायी समिती असा संघर्ष सुरू होता. आयुक्तांनी पाठवलेले अनेक विषय दुरुस्तीसह फेर सादर करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले. तसेच आर्थिक हितसंबंध जपल्याचा आरोप झाला. हुतात्मा भाडेवाढ, रस्त्याची कामे असे सुमारे १०० विषय स्थायीत ४५ दिवसांत निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी ते विषय काढून घेतले.

यांच्या नावाची चर्चा सुरू

काँग्रेसकडूनसुमारे १२ जणांची नावे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे देण्यात आली असून, मागील तीन वर्षात मनपात कोणतेही पद मिळाले नाही त्यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून सरस्वती कासलोलकर, इस्माईल शेख, अनिल पल्ली, विनोद गायकवाड, जगदेवी नवले, श्रीदेवी फुलारे आदी नावे चर्चेत आहेत.
बसप माकपकडून पुन्हा आनंद चंदनशिवे स्थायीत येतील. भाजपकडून नागेश वल्याळ, श्रीकांचना यन्नम, संजय कोळी, सुवर्णा हिरेमठ, चंद्रकांत रमणशेट्टी, कल्पना कारभारी आदी नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून िपरअहमद शेख, शांता दुधाळ, बिसमिल्ला शिकलगार, सुनीता कारंडे, सुनीता रोडे हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींची बुधवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात बैठक होणार आहे. तेथे दोन नावांची निवड होईल.