आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sthanik Swarajya Din Special Mayor Alka Rathod Interview

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर अलका राठोड म्हणतात, पालिकेला 50 % यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लोकप्रतिनिधींनी धोरणात्मक निर्णय घ्यावे आणि प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी करावी, असे लोकशाहीचे सूत्र आहे. आज अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिन. यानिमित्ताने महापौर अलका राठोड यांच्याशी साधलेला संवाद..

पालिकेच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीस जबाबदार कोण?

स्थानिक संस्था कराची (एलबीटी) वसुली करण्यात अपयश आल्याने पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली. याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. आम्ही वेळोवेळी उत्पन्न वाढवण्याच्या सूचना दिल्या. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.

जनता कर भरते, त्यातील किती रक्कम खर्च करण्यात येते?

एका व्यक्तीस दररोज 135 लिटर पाणी देतो, कचरा उचलतो, सफाई करतो, दिवाबत्ती आदी सुविधा देतो. एका माणसामागे दररोज 20 रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जातो.

आयुक्तांनी सभागृहाचे विषय काढून घेतल्यामुळे सत्ताधार्‍यांनी लोकांचा विश्वास गमावला का?

नाही. मी वेळोवेळी सभा बोलावली, पण काही कारणास्तव ती होऊ शकली नाही. यापुढे सभा वेळेवर होतील.