आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्याप ११ लाख लोकांकडे नाही 'आधार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील दोन लाख, तर ग्रामीण भागातील सुमारे साडेनऊ लाख असे एकूण ११ लाख ५८ हजार नागरिकांकडे अद्याप आधारकार्ड नाही. या २० टक्के नागरिकांना एक महिन्यात आधार कार्ड देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
३१ मार्च अखेरपर्यंत शहरातील लाख ९४ हजार, तर जिल्ह्यातील ११ लाख ५८ हजार नागरिकांकडे आधार क्रमांक नाही. यासाठी सर्व यंत्रणा एकाच तालुक्यात लावून गावनिहाय नोंदणी १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे. नोंदणी गेल्या वर्षापासून सुरू आहे. यंत्रणाच तोकडी असल्याने अनेक ठिकाणी नोंदणी पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, आलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमुळे काम थांबले होते.

३४ हजार १५१ बालकांना आधार
नर्सरीअंगणवाडीतील बालकांचीही आधार नोंदणी करण्याचे आदेश होते. जिल्ह्यात ३४ हजार १५१ बालकांची नोंदणी झाली. आतापर्यंत ४० टक्के बालकांची नोंदणी झाली आहे. यंत्र उपलब्ध नसल्याने नोंदणीत विलंब होत आहे.

हे आहे नियोजन
तालुकानिहायउद्दिष्ट देण्यात आले आहे. १० दिवसांमध्ये उर्वरित सर्वांची नोंदणी होणार आहे. तालुक्यांचा एक गट केला आहे. ते दिवसांत एक तालुका याप्रमाणे १० दिवसात सर्व गावांत नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

सध्या७८ यंत्रे : नोंदणीसाठीसध्या ७८ यंत्रे आहेत. काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हजार २०० यंत्रांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.