आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल अजूनही 'नॉट कनेक्टिंग'च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूरध्वनी क्षेत्रातील नामवंत अग्रगण्य कंपनी म्हणून एकेकाळी ओळख असलेली कंपनी म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल). परंतु सध्या बीएसएनलच्या भ्रमणध्वनी आणि लँडलाइन कनेक्शन ग्राहकांना अनंत अडचणीतून मार्गक्रमण करावे लागते आहे. टॉवरच्या खाली उभारून फोन लावला तरी "आउट ऑफ कव्हरेज' असे ऐकवण्यात येते. काहीना आजपर्यंत पुनर्जोडण्या करून दिलेल्या नाहीत. तसेच, ज्यांनी जोडण्या बंद केल्या त्यांना सहा-सहा महिने आपल्या अनामत रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ही कंपनी "कनेक्टिंग इंडिया' या तिच्या ब्रीदाला जागते की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दिवसेंदिवस टेलिफोन कनेक्शन्सबरोबर मोबाइलधारकांची संख्या वाढत असताना टॉवरची क्षमता वाढवण्यात आली नाही. त्यामुळे खासकरून बीएसएनएलच्या ग्राहकांना रेंजचा त्रास सहन करावा लागत आहे. मोबाइलधारकांना कव्हरेज मिळत नाही. एवढेच नाही तर मोबाइल टॉवर जवळ असल्यानंतरही मोबाइलधारक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे दाखवले जाते. बऱ्याच वेळा फोनकॉल कट होतो. यामुळे मनस्ताप सोसण्याशिवाय पर्यायच राहात नाही. याबाबत अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतु याचा काहीही फायदा झाला नसल्याचे समोर आले आहे. परिणामी मोबाइलधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जोडणी केली पण मनोरे?
शहरातबीएसएनएलचे सर्वाधिक ग्राहक आहेत. बीएसएनएलने मोबाइल टॉवर उभारले या टॉवरच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूकही केली. बहुतांश शासकीय कार्यालयांचा कारभार ऑनलाइन पद्धतीनेच चालतो. इंटरनेट सेवेसाठी या कार्यालयांना ब्रॉडबँडची जोडणी देण्यात आली आहे. मोबाइलधारकांसाठी मनोरेही उभारण्यात आले आहेत. परंतु हे मनोरे व्यवस्थित काम करत नाहीत, असे दिसून येत आहे.

होय, अनामत देण्यास उशीर
पूर्वी कनेक्शन कट केल्यावर देय अनामत रकमा त्वरित दिल्या जायच्या. परंतु आता हे काम मुंबईहून ऑनलाइन प्रकारातून होत आहे. त्यामुळे विलंब होत आहे. तसेच बीएसएनएलकडून ग्राहकांना चांगली सुविधा देण्यात येत आहे, देण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही काही अपरिहार्य कारणांनी समस्या निर्माण होतात. आम्ही त्या वेळीच सुधारण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे. शिवशंकर झा, मुख्य अधिकारी बीएसएनएल, सोलापूर विभाग

कनेक्टिंग इंडियाचा दावा फोल
मागीलवर्षांत बीएसएनएलच्या लँडलाइन दूरध्वनीची संख्या झपाट्याने कमी होऊन तेवढ्याच वेगाने वाढलेल्या मोबाइलधारकांनाही बीएसएनएलने उत्तम सेवा दिली नसल्याचे समोर येत आहे. फोन बंद होणे, क्रॉस कनेक्शन, खराब साहित्य अशा प्रकारच्या तक्रारी असतात. परंतु त्याची वेळीच दखल घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. तक्रारींचा पाऊस पडला तरी त्याचे योग्य निरसन होत नाही. यावरून बीएसएनएलचा अकार्यक्षमपणा दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकदा ही सेवा विस्कळीत झाल्यावर त्याचा परिणाम बँका, एटीएम, इंटरनेट, दूरध्वनी आणि मोबाइलसेवेवर होतो. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते.

पैसे उशिरा मिळताहेत
मी माझी जोडणी बंद करावी म्हणून ऑक्टोबर २०१४ मध्ये अर्ज केला. त्यानुसार जोडणी काढण्यात आली. परंतु त्याची १६५१ रुपये ही अनामत रक्कम आठ महिन्यांनी मिळाली. यामुळे आम्हास विनाकारण त्रास झाला. अनामत रक्कम ग्राहकाला त्वरित मिळाली पाहिजे. ए.व्ही. जोशी, तक्रारदार ग्राहक

डिरेक्टरी मिळालीच नाही
मागील अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी येणारी नाव क्रमांकांची बीएसएनएलची डिरेक्टरी यंदा मिळालीच नाही. याबाबत विचारण्यासाठी बीएसएनएलच्या कार्यालयात गेलोे असता आता डिरेक्टरीऐवजी सिडी देण्यात येईल असे सांगण्यात आले. संभ्रम अणवेकर, ग्राहक

अनावश्यक काॅलर ट्यूनमुळे मनस्ताप
माझ्यामोबाइलवर मध्यंतरी अचानक एक विचित्र गाणे कॉलर ट्यून म्हणून कंपनीकडून लावण्यात आले. मुळात हे सुरू करावे अशी मी कोणतीही सूचना दिली नव्हती. त्यासाठी माझा बॅलन्सही कापण्यात आला. याचा मला मनस्ताप झाला. महेश वाळके, पीडित ग्राहक
बातम्या आणखी आहेत...