आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल न दिल्याने हाशमिया विद्यालयावर दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रामवाडीतील हाशमिया उर्दू अध्यापिका विद्यालयातील डी.एड.च्या प्रथम वर्षाचा निकाल मागील काही दिवसांपासून तांत्रिक कारणांनी रखडला होता. संस्थेने 5 नोव्हेंबर रोजी निकाल देण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासन देऊनही निकाल न दिल्यामुळे चिडलेल्या काही जणांनी संस्थेच्या इमारतीवर दगडफेक केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.

हाशमिया विद्यालयात प्रथम वर्षाचा निकाल घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून येथील विद्यार्थिनी संस्थेचे उंबरठे झिजवत आहेत. संस्थेचे संचालक निकालाबाबत आज, उद्याचेच आश्वासन देत होते. काही विद्यार्थिनीनी गेल्या आठवड्यात संस्थेच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन लवकर निकाल द्या, अशी विनंती केली होती. यानंतर संस्थेचे सचिव फयाज शेख यांनी 5 नोव्हेंबर रोजी निकाल देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आज सकाळी विद्यार्थिनी पालकासह निकाल घेण्यासाठी विद्यालयात जमल्या. पण, निकाल मिळत नसल्याचे पाहून यातील काही तरुणांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच सलगरवस्ती ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.