आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop To Gaza Attack, Jamiyata Ulema Hind's Dimand

गाझावरील हल्ले रोखा , सोलापूरच्या जमियत उलेमा हिंदची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - इस्रायल गाझावर करत असलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 350 लोक मारले गेले. त्यात महिला आणि बालकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. हल्ले रोखण्यासाठी भारताने इस्रायलवर दबाव आणावा, अशी मागणी येथील ‘जमियत उलेमा हिंद’ या संघटनेने केली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठवले. त्याची प्रत निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनाही दिली.
संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम, सरचिटणीस मैनोद्दिन शेख, रशीद शेख, मौलाना ताहेर बेग, मौलाना जबीउल्लाह, मौलाना युसुफ, अब्दुलवहाब चामाकोरा, मन्नन पठाण आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. त्यात इस्रायलकडून होणार्‍या हल्ल्यांचा निषेध नोंदण्यात आला. देशांनी इस्रायलवर दबाव आणण्याची गरज आहे. लोकसभेचे विशेष सत्र बोलावून इस्रायलकडून होणार्‍या हल्ल्यांचा निषेध करावा.