आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेने घेतल्या ‘चॉइस’च्या 20 बस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका परिवहन विभागाने चॉइस कंपनीकडून 20 बस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. त्या बस चॉइस कंपनीकडून महापालिकेने ताब्यात घेतल्या. त्यामुळे चॉइसचा मक्ता संपुष्टात आला आहे. महापालिका परिवहन विभागावर नजर ठेवण्यासाठी चॉइस कंपनीकडून एकाची नेमणूक केली आहे. परिवहन विभागातील कामाकाजाची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बुधवारी सात रस्ता येथील डेपोस भेट दिली.

डेपोस गुडेवारांची भेट

परिवहन विभागातील कामाकाजाची पाहणी करण्यासाठी बुधवारी आयुक्त गुडेवार सात रस्ता डेपोत गेले होते. तेथील कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करून कर्मचार्‍यांना खडेबोल सुनावले.

चार कोटींत 20 बस
चॉइस कंपनीने महापालिकेला 20 बस भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. करारामध्ये तफावत असल्याचा त्या कंपनीकडून प्रस्ताव आल्याने 20 बस मनपाने वर्ग करून घेतल्या. त्यापोटी कंपनीस 96 लाख रुपये आणि बँक कर्ज महापालिकेस फेडावे लागेल. त्यासाठी चार कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

आजपासून आहेरवाडी बस सेवा
एनटीपीसीच्या वतीने प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांच्या सेवेसाठी एक बस देण्यात आली आहे. ती परिवहनच्या ताब्यात देण्यात आली. ती बस पांजरपोळ चौक ते आहेरवाडीदरम्यान फेर्‍या करणार आहे. त्या बसचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 11 वाजता फताटेवाडी येथे आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसे पत्र एनटीपीसीकडून महापालिकेस देण्यात आल्याची माहिती, परिवहन व्यवस्थापक ए. ए. पठाण यांनी दिली.

परिवहनवर नजर
सात रस्ता डेपोत कर्मचार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी चॉइस कंपनीकडून देखभाल करण्यासाठी शरीफ सय्यद यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सय्यद यांच्याकडे कर्मचारी हाताळण्याची कुशलता असल्याने त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.