आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 महिन्यांत ‘व्हॉल्वो’ला 18 लाखांचा तोटा, आता गरज कठोर उपाययोजनांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरची शान ठरलेल्या व्हॉल्वो बसगाड्यांवर नियोजनशून्यतेमुळे दोनच महिन्यात 18 लाखांचा तोटा सहन करण्याची पाळी आली आहे. लोकानुनय करण्यासाठी सामान्य बसगाड्यांएवढेच ठेवण्यात आलेले तिकीट दर आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षा, अँपेरिक्षांकडून करण्यात येणारी अवैध वाहतूक सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच दखल घेऊन कठोर नियोजन केल्यास परिवहन फायद्यात येऊ शकते आणि सोलापूरकरांसाठी सुरक्षित प्रवासाची हमीही मिळू शकते.
केंद्र सरकारच्या जेएनयूआरएम योजनेअंतर्गत शहरात व्हॉल्वो कंपनीच्या दहा बस आले आहेत. 4 एप्रिलपासून सुरू झालेल्या या गाड्यांना दोन महिन्यात 18 लाख 27 हजार 224 रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. आधीच ऑक्सीजनवर असलेल्या परिवहनला असाच तोटा सहन करावा लागला तर मृत्यूशय्येवर जाण्यास फार काळ लागणार नाही. आरटीओचे काहीच नियंत्रण न राहिल्याने व्हॉल्वो बसच्या समोरच अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

.. तरच टिकेल परिवहन
परिवहन सदस्य अनिल कंदलगी यांनी सांगितले की, ‘परिवहन सेवा फायद्यात आणण्यासाठी एसटीतील निवृत्त अधिकारी खोबरे यांना आणले. त्यांच्यामागे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय दवावाला बळी न पडता काम करावे. परिवहन सेवा फायद्यात आणावी. तोट्यात चाललेली व्हॉल्वो बस सेवा नफ्यात आणली तरच परिवहन वाचेल.’