आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ ऑनलाइन, विद्यार्थी मात्र ऑफलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर = सोलापूर विद्यापीठाने यंदा प्रथमच बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन घेणे सुरू केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना ही पद्धत समजून घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे त्यांनी विद्यापीठाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. अर्ज भरण्याची २२ ऑगस्ट अंतिम तारीख आहे. २७ तारखेपर्यंत विलंबशुल्कासह अर्ज भरता येईल.

बी. ए., बी. कॉम. भाग एक ते तीन तसेच एम. ए., एम. कॉम. भाग एक व दोन या बहि:स्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणींविषयी विचारले असता नूतन परीक्षा िनयंत्रक बी. पी. पाटील म्हणाले की, "प्रत्यक्षात अर्ज भरण्याची पद्धत खूपच सोपी आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना समजून घेतल्या तर कोणतीही अडचण येणार नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे जवळ असली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी १६ अंकी पीएनआर क्रमांक व पासवर्ड चा वापर करावा. पासवर्ड नसल्यास फरगॉट पासवर्ड या सुविधेचा वापर करावा. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी, आवश्यक त्या कागदपत्र व शुल्कासह विद्यापीठात भरावी.'
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आहे. ती सोपी आहे. आगामी काळात ती प्रभावीपणे अमलात येणार आहे. त्याची ही सुरुवात मानावी लागेल.”
डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
नेट कॅफेत दोन दिवसांत ८० रुपये देऊनही अर्ज भरता आला नाही. अखेर २०० रुपये प्रवास खर्च केला, तुंगतहून विद्यापीठात आलो. एका दिवसात फक्त अर्ज भरून झाला. उद्या तपासणी व शुल्क भरणे होईल.”
सारंग रणदिवे व संजय अमंगे, विद्यार्थी
तरीही रांगा ..
ऑनलाइन अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात केली. यासाठी ग्रंथालयात चार संगणक सुरू केले आहेत. रांग लागली असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खूप वेळ लागत आहे. अर्ज तपासणीसाठी, शुल्क भरण्यासाठी रांगा िदसत आहेत.