आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वीच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू, अभ्यासाला गेलेला रितेश तोल जाऊन पडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सिद्धेश्वर प्रशालेत दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अभ्यास करायला गेल्यानंतर तोल जाऊन पडल्यामुळे बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी इंग्रजीची तोंडी परीक्षा होती. तीन मार्चपासून मुख्य परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षेचा आधीच रितेश दीपक भैरप्पा (वय १५, रा. घोंगडेवस्ती, नॅशनल लाँड्रीजवळ) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमाराला ही घटना घडली.
रितेश सकाळी दहाच्या सुमाराला घरातून बाहेर पडला. दुपारी बाराच्या सुमाराला दहावीची तोंडी परीक्षा असल्यामुळे तो अभ्यास करण्यासाठी पठाण बागेजवळील कट्ट्यावर बसला होता. अकराच्या दरम्यान तोल जाऊन खाली पडल्यामुळे पाण्यात बुडाला. काही वेळाने त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यापूर्वी काही तरुणांनी काठावर शाळेची बॅग पाहून त्यात आयडीकार्ड मिळाल्यानंतर शाळेत दिले. नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर आले. फौजदार चावडीचे नाईक रवी काळे यांनी पंचनामा केला.
वीस फूट खोल पाणी
पठाणबागेच्या बाजूला आणि विष्णू घाट भागात सुमारे वीस फूट खोल खड्डा आहे. अभ्यास करीत बसल्यानंतर तोल जाऊन तो पडला. नातेवकाईकांची कुणाची तक्रार नाही. संशयास्पद काही आढळले नाही असे पोलिस नाईक काळे म्हणाले.