आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Died In Passenger Jeep, Angered Citizens Set Fire

प्रवासी जीपच्या धडकेत विद्यार्थी ठार, संतप्त नागरिकांनी दोन जीप पेटवून दिल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर/ दक्षिण सोलापूर - प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपच्या धडकेत दहा वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात कुंभारी गावाच्या मुख्य रस्त्यालगत शुभांगी हॉटेलसमोर सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला घडला. सागर ज्ञानेश्वर चाबुकस्वार (वय १०, रा. कुंभारी) असे मृत मुलाचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने अपघातग्रस्त जीपसह दोन वाहने पेटवली. चालकाला बेदम चोप दिल्यामुळे तोही जखमी झाला आहे.

सागर हा गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकत होता. घरातून तो सकाळी साडेअकराला बाहेर पडला. शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडताना जीपची (एमएच १३ बी ९४८३) धडक बसली. चाकाखाली सापडल्यामुळे त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. चालक शिवशरण शांतप्पा बनसोडे (रा. गळोरगी, ता. अक्कलकोट) याला बेदम चोप देण्यात आला. त्याला पोलिसांनी शाासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दोन जीपही पेटवून देण्यात आल्या. ही घटना कळताच वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवले.

अवैध जीप प्रवासी वाहतूक थांबेल का? शहर-जिल्ह्यातूनअवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे. जीप चालकांत जणू प्रवासी घेण्यासाठी स्पर्धा सुरूच असते. वेगात जीप ये-जा करतात. ही बेकायदेशीर वाहतूक थांबवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी जीपवर बंदी आणावी.

सागरचा मृतदेह पाहून आईसह नातेवाइकांनी मोठा अक्रोश केला. काही काळ नागरिकांनी रस्ता अडवला. पोिलस फौजफाटा आल्यानंतर नागरिक शांत झाले. वळसंगचे सहाय्यक निरीक्षक चोरमुले त्यांच्या पथकाने मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय रुग्णालयात आणले. मुलाचे काका महादेव चाबुस्कवार यांनी फिर्याद दिली आहे. जीपचालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताचा मृत सागरचे आई-वडील आणि नातेवाइकांनी हंबरडा फोडला. दुसऱ्या छायाचित्र संतप्त नागरिकांनी दोन प्रवासी जीप पेटवून दिल्या.

मृत : सागर चाबुकस्वार