आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Invented New Instrument To Avoid Road Accident

विद्यार्थ्यांनी बनवले नावीन्यपूर्ण उपकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ब्रम्‍हदेवदादा माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील (बीएमआयटी) विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट’ (प्रकल्प) उपक्रमांतर्गत बसगाडीवर नियंत्रण आणणारे उपकरण बनवले आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न उत्तम असून उपकरणाचे ‘ट्रायल’ आम्ही घेऊ, असे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. दि. 15 ऑक्टोबर रोजी ट्रायल घेतल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

मोहसीन जमादार, अंकिता पवार, प्रांजली कुलकर्णी आणि सना शेख या चौघा विद्यार्थ्यांना बस नियंत्रण उपकरण हा विषय ‘प्रोजेक्ट’साठी देण्यात आला होता. विभागप्रमुख एस. जी. कुलकर्णी, प्रा. गुलनाझ ठाकूर, प्रा. आसिया खान, प्रा. पल्लवी साळुंके, प्रा. प्रवीण बिराजदार, प्रा. दीपक ममदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्टपासून ‘प्रोजेक्ट’ची तयारी सुरू केली. विविध ठिकाणी वापरण्यात येणार्‍या तंत्र त्यांनी या उपकरणात एकत्र आणले. दीड महिन्यात उपकरण बनवले.

पुढे काय ?
विद्यार्थ्यांचा प्रयत्न चांगला आहे. 15 ऑक्टोबरची ट्रायल यशस्वी झाली तरी सोलापूर परिवहनमध्ये ही यंत्रणा लागू करणे खार्चिक ठरेल. प्रती बस सव्वा लाख रुपये खर्च आहे. सोलापुरात आजच्या घडीला या उपकरणाची आवश्यकता आहे का, याचा किती प्रवाशी लाभ घेतील हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे.

उपकरणातील सोयी
प्रत्येक बस थांब्यावर स्क्रीन बसवून बसची वेळोवेळी माहिती देता येईल.


मोबाइल अँपच्या मदतीने घरातूनही स्मार्ट फोनद्वारे बस किती वेळेत थांब्यावर येईल याची माहिती मिळेल. या तंत्राचा वापर सध्या भारतीय रेल्वेत सुरू आहे.


सेन्सरचा वापर करून ठरावीक अंतरावर असतानाच रस्त्यावरील खड्डय़ांची किंवा अडथळ्यांची माहिती चालकास मिळेल.


अती दारू पिऊन आलेल्या चालकास बस चालूच होणार नाही. या ठिकाणी ब्रिदिंग सेन्सरचा वापर केला आहे.