आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या पाससाठी विद्यार्थ्यांची दमछाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एसटी बसचा पास काढण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांची दमछाक होत आहे. पास काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना सोलापूर गाठावे लागत आहे. यात विद्यार्थी आणि पालकांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. पास काढण्यासाठी कॉलेजला दांडी मारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. महाविद्यालयांच्या बेफिकीरीमुळेच विद्यार्थ्यांना हा त्रास सोसावा लागत आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थी असतील त्या ठिकाणी जाऊन पास देण्याची योजना एसटीकडे आहे. परंतु यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेने सहकार्य करणे गरजेचे असते. महाविद्यालयाने किमान एक कर्मचारी एसटीच्या कर्मचार्‍यासोबत दिल्यास विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत नाही.

इंधन दरवाढीमुळे पास महागले
राज्य परिवहन महामंडळाने कामगारांच्या वेतन वाढीचा करार आणि इंधनात झालेल्या दरवाढीचे कारण पुढे करत प्रवासी भाड्यात सोमवार, एक जुलैच्या मध्यरात्रीपासून वाढ केली. एसटीने प्रतिटप्प्यांमध्ये ही दरवाढ केली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे पासही महागले.

दुष्काळात विद्यार्थ्यांची कुचंबणा
शिक्षणाचा खर्चच पेलत नाही. त्याच्या जोडीला आता पासेसचेही दर वाढल्यामुळे शिक्षण घेणे महाग होणार आहे. जिल्हा दुष्काळात होरपळला असताना ही दरवाढ न झेपणारी आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे परवडणार नाही. कु लदीप काळे, पासधारक विद्यार्थी

पाससंदर्भात सोलापूर एसटी आगारातील सर्व शाळा व महाविद्यालयांना लेखी कळवण्यात आले होते. परंतु शाळा-महाविद्यालयांनी याला प्रतिसाद दिला नाही. मुकुंद दळवे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक