आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२५ चिमुकल्या हातांनी रंगवली भिंत, बालभवनचा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कोणाच्याहाती पिवळा, गुलाबी रंग तर कोणाच्या हाती रंगांचे इंद्रधनुष्य. चिमुकल्या हातांना मंगळवारी सकाळी प्रतिभेचे धुमारे फुटले. सकाळच्या मंद गारव्यात, झाडांच्या सावलीत कोणी फुलपाखरू काढले, काेणी ढगाआडून उगवणारा सूर्य तर कोणी फुले चितारण्यात दंग. सारेच रंगांच्या दुनियेत हरवून चित्रे रेखाटण्यात मश्गुल झालेले. निमित्त होते वॉल पेन्टिंगचे. दिशा अभ्यास मंडळ संचलित बालभवनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त चला, सोलापूर संुदर करूया या वाॅल पेंटिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुमारे १२५ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी रंग कुंचल्याच्या माध्यमातून स्वत:चे भावविश्व साकारले. संगमेश्वर कॉलेजची भिंत हा या चिमुकल्यांचा कॅनव्हास ठरला. ते १२ वयोगटातील मुलांनी यात सहभाग नोंदवला. सकाळी उठल्यानंतर तुुम्ही जे काही पाहता, जे अनुभवता ते चित्ररूपाने मांडणे, हाच त्यांच्या चित्रांचा विषय होता. त्यामुळे मुलांनी आकाशात उडणारे पक्षी, फुलपाखरू, सूर्य, फुले अशी विविध चित्रे भिंतीवर काढली. या उपक्रमात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची मुले, बीसी गर्ल्स हॉस्टेलच्या मुली अन्य मुला-मुलींचा समावेश होता.

यावेळी नीला मोरे, अपर्णा बनसोडे-कांबळे, विद्यासागर मोरे, अरुणा म्हैत्रस, मीनाक्षी रामपुरे, गीतांजली दिड्डी, काशीनाथ आकाशे, स्वाती देशपांडे, अश्विनी म्हैत्रस आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी संगमेश्वर महाविद्यालयाच्या भिंतीवर चिमुकल्या हातांनी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढली.