आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट पास नसल्याने सोलापूरकरांची होतेय अडचण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पुण्यासाठी उत्तम पर्याय असलेल्या हुतात्मा एक्स्प्रेसला थेट पास काढता येत नाही. त्यामुळे चाकरमान्यांसह सामान्य प्रवाशांची अडचण होत आहे. अनेकजण रोज पुण्यास ये-जा करतात. मात्र, त्यांना थेट एकच पासऐवजी तीन-तीन पास काढावे लागतात. त्यामुळे थेट पास देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

रेल्वेच्या नियमाप्रमाणे 150 कि.मी.पेक्षा जास्त अंतरास पास दिला जात नाही. मात्र, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व सुरत अशी काही अपवाद असलेली शहरे आहेत.

या शहरातील अंतर जास्त असले तरी राष्ट्रीय विकास उद्दिष्टासाठी अपवाद आहे. तरी या शहरांना थेट पासची सुविधा बहाल करण्यात आली आहे. असाच अपवाद सोलापूर-पुणेसाठी व्हावा, अशी प्रवाशी संघाची मागणी आहेत.

यांना आहे थेट पास, स्वतंत्र डबा
पुणे-मुंबई (192 किमी), चर्चगेट -सुरत (267 कि मी), नाशिक-मुंबई (172).
मुंबई, पुणे, सुरत आदी शहरांप्रमाणे सोलापूरसाठीही नियमात शिथिलता आणावी..

आर्थिक बचत होईल
थेट पास मिळाल्यास पासधारकांची आर्थिक बचत होईल. शिवाय प्रवास ही सुखकर होईल. पुण्यात जाऊन स्थायिक होणार्‍या लोढय़ास काहीसा ब्रेक लागेल.’’ संजय पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा प्रवासी संघ

आमचा प्रश्न सोडवा
पुण्यात व्यवसाय आहे. रोज पुण्याला अप-डाऊन करतो. गाडीत बर्‍याचवेळा जागा मिळत नाही. थेट पास मिळाल्यास आपसुकच पासधारकांसाठी स्वतंत्र डबा मिळेल. रेल्वे प्रशासनाने आमचा प्रश्न सोडवावा.’’ संजय चौगुले, हुतात्माचा पासधारक

पास, विशेष डबा द्या
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस गेल्या 12 वर्षांपासून अव्याहत धावते. याचा सुमारे चारशे पासधारकांसह सामान्य प्रवासी लाभ घेत आहेत. थेट मासिक किंवा त्रैमासिक पास आणि पासधारकांसाठी स्वतंत्र डबा, अशी मागणी आहे. पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासाठी अशी खास सोय आहे. रेल्वेचा नियम 1951चा आहे. 64 वर्षांत रेल्वे विस्तारीकरणात प्रचंड फेरबदल झाले. पण नियमाला धक्का लागला नाही.

पुणे प्रवास
रेल्वे नियमांचा फटका, 150 किमीहून जास्त अंतराला रेल्वेचा रेड सिग्नल, रेल्वे प्रवासी संघटनेने केली मागणी