आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘मी आत्महत्या करतोय, याला कुणी जबाबदार नाही. अथवा कारण शोधण्याचा कुणी प्रयत्न करू नये’, अशी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून ठेवून एका तरुण विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिरीष रघुनाथ वाघमारे (वय २३, रा. वेणुगोपाळनगर, अक्कलकोट रस्ता, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. कारण स्पष्ट झाले नाही.

शिरीष केगावजवळील एका महाविद्यालयात एमसीएसच्या तृतीय वर्षात शिकत होता. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला घरी पंख्याला लुंगीने गळफास घेतला. काही वेळाने आई शैला वाघमारे यांनी ही घटना पाहून त्याला उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. शिरीष याच्या मागे वडील, आई, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

तपास अधिकारी फौजदार दत्ता लिगाडे यांना विचारले असता, मृत्यूपूर्व चिठ्ठी सापडली असून त्यात कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वी तो मित्राकडे राहत होता. घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार केला आहे.