आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा विद्यार्थ्यांची, ओसरल्या गुरुजी होण्यासाठीच्या रांगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गुरुजी होण्यासाठी आवश्यक असलेल्या डी. टी. एड. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती यंदाही कायम आहे. विनाअनुदानित तत्त्वामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्या. पर्यायाने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातून या अभ्यासक्रमाकरता शनिवार सायंकाळपर्यंत केवळ ८३ अर्ज दाखल झाले. १५ जून हा अर्ज विक्रीचा अंतिम दिनांक आहे. १६ जूनपर्यंत अर्ज भरता येईल.
डीटीएड अभ्यासक्रमाकरता जिल्ह्यात पंढरपूर वेळापूर अशा दोन ठिकाणी अर्ज विक्री स्वीकृती केंद्रे आहेत. यंदा सोलापुरात याकरताकेंद्र देण्यात आले नाही. वेळापूर डायटचे केंद्र तर पंढरपूर मध्यवर्ती केंद्र असल्याने या दोन ठिकाणी अर्ज विक्री स्वीकृती होत आहे, असे ज्येष्ठ अधिव्याख्याता जितेंद्र साळुंखे यांनी सांगितले.
नोकरीची हमी नाही
राज्यात मे २०१० नंतर शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) झालेली नाही. तसेच २०१३ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मध्ये लाख ९१ हजार ९९० तर सन २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत लाख ८८ हजार ६९९ इतके विद्यार्थी बसले होते. ही वस्तुस्थिती पाहता प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात म्हणजे डीटीएडला प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळेल याची खात्री नाही, असे निवेदन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने प्रसिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली.
३५०० जागा
सोलापूर जिल्ह्यात डीटीएड अभ्यासक्रमाकरता यंदा एकूण ५१ विद्यालये सुरू असतील. यातील एक विद्यालय शासकीय आहे तर विद्यालये अनुदानित. ४५ विनाअनुदानित विद्यालयेही प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाली आहेत. जिल्ह्यात डीटीएड अभ्यासक्रमाच्या सुमारे ३५०० हजार जागा असल्या तरी विद्यार्थी संख्या खूपच कमी झाल्याचे दिसून येते.
- गत दोन वर्षापासून या अभ्यासक्रमाला कमी प्रतिसाद मिळत आहे. तरुणांचा कल कमी झाल्याचे दिसून येते. अर्ज विक्री स्वीकृतीच्या अंतिम तारखेपर्यंत प्रतिसाद वाढेल, असे म्हणता येईल. आम्हाला अजूनही आशा आहे.
जितेंद्र साळुंखे, ज्येष्ठ अधिव्याख्याता