आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Caste Verification Certificates Pending

जात पडताळणी; हजार २९२ विद्यार्थ्यांचे दाखले प्रलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आता निकालानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे वेधले आहे. इंजिनिअरिंग, वैद्यकीय, डी.एड. अशा प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य आहे. मागील वर्षभरात दाखल केलेल्या प्रकरणांपैकी सुमारे २२९२ जणांच्या फायलींमध्ये त्रुटी निघालेल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर केली, तरच त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकते, अन्यथा प्रवेशावेळी अडचण येऊ शकते.
एकीकडे जात पडताळणीसाठी काहींना हेलपाटे घालावे लागतात. शिवाय तयार असलेली सुमारे हजार प्रमाणपत्रे घेऊन जावेत, यासाठी कार्यालयही त्यांची वाट पाहते आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत हजार ३२१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेशासाठीचे जात पडताळणी अर्ज मंजूर केले असून त्रुटी असलेल्या कागदपत्रांअभावी २२९२ प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय अन्य कारणांसाठीची प्रकरणे प्रलंिबत आहेत.
कामासाठी लाच मागितल्यास करा तक्रार
- पाच हजार जात वैध प्रमाणपत्र तयार आहेत, अर्जदारांनी घेऊन जावेत. या विभागातील कोणी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास, थेट लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार करावी.
बी. जी. अरवत, सदस्य सचिव, समिती क्र.१
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ ची शैक्षणिक वर्षातील अशी आहे आकडेवारी

अवैध प्रकरणे
१११
प्रलंबित दाखले
९३२१
मंजूर दाखले
२२९२
शैक्षणिकसह २०१४-१५ या वर्षात दाखल केलेल्या १३,१५६ प्रकरणांपैकी सुमारे ५०८८ प्रकरणात त्रुटी असल्याने संबंधितांना एसएमएस पत्राद्वारे कळवले आहे. अर्जदारांकडून तितकासा प्रतिसाद नाही.
ऑनलाइन अर्ज दाखल करावा
इयत्ता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिली आहे. मात्र अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केला नाही. त्यांना ऑनलाइनद्वारे अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज दाखल करून प्राचार्यांच्या शिफारीसह समिती कार्यालयाकडे व्यक्तीश: अर्ज दाखल करावा. अर्जदाराने रक्तनाते संबंधातील व्यक्तींचे उदा. वडील, सख्खे भाऊ, चुलते, आजोबा, आत्या यांचे शाळा सोडल्याचे दाखले, जन्म नोंदीचे उतारे, गाव नमुना नंबर १४ तसेच महसुली कागदपत्रांमध्ये जात नोंदी संदर्भातील पुरावे जोडावेत.