आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Study Committee For Auto Rickshaws Worker Welfare Board

रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापण्यासाठी अभ्यास समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यासाठी कामगार आयुक्त मधुकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियुक्त केली आहे. तामिळनाडूच्या धर्तीवरील सुविधांचा अभ्यास करून या समितीने दोन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत समिती तयार झाली. त्याचे 7 शासकीय तर दोन अशासकीय सदस्य आहेत. विधान परिषद सदस्य मोहन जोशी, कामगार खात्याचे सहसचिव बाळासाहेब कोळसे, अपर परिवहन आयुक्त एस. बी. सहस्रबुद्धे, कोल्हापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने, ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेचे नितीन पवार (पुणे), साहाय्यक कामगार आयुक्त संकेत कानडे हे सदस्य आहेत.

काय करणार समिती?
तमिळनाडूतील रिक्षा व टॅक्सीचालकांसाठीच्या योजना पाहणार
तमिळनाडू सरकार चालकासाठी किती पैसे देत आहे?
वाहतूक विम्यातून या चालकांना बाहेर काढता येईल का?
निधी उभारण्यासाठी लाभार्थी किती शुल्क घ्यायचे?


तमिळनाडूत काय आहे?
रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ
चालकांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्य, बोनस, पेन्शन
निधीत लाभार्थ्याचा सहभाग सक्तीचा, त्यासाठी कायदेशीर बाबी

विम्याची रक्कम पडून
रिक्षाचालकांच्या कल्याणकारी योजनेचा सविस्तर अहवाल चार वर्षांपूर्वीच दिला होता. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष केले. आता आगामी निवडणुका पाहून अभ्यास समिती नियुक्त केली. त्याचा अहवाल येणार कधी? विधिमंडळाच्या पटलावर चर्चा होईल कधी? यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाबाबत असाच प्रकार सुरू आहे. तसे होऊ नये म्हणजे झाले.’’ नरसय्या आडम, सल्लागार लालबावटा रिक्षाचालक संघटना.