आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhash Patil And Ashvin Patil Death In Accident

नारायण राणे समर्थक सुभाष पाटील यांच्यासह दोघांचा अपघाती मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कंटेनर आणि फॉर्च्युनर वाहनांत झालेल्या भीषण अपघातात स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष शंकरप्पा पाटील (40, रा. सोलापूर) व त्यांचे सहकारी अश्विन नागेश पाटील हे जागीच ठार झाले. मुंबई- गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर गावाजवळ रविवारी हा अपघात घडला. चालक सागर अनंत कर्णेकर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महसूलमंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी कणकवली, मालवण येथे मेळावे होते. त्यासाठी सोलापुरातून सुभाष पाटील यांच्यासह 100 कार्यकर्ते शुक्रवारी सकाळीच खासगी वाहनाने गेले होते. रविवारी सकाळी पाटील हे आपल्या फॉर्च्युनर गाडीने मुंबईकडे निघाले होते. या वेळी परसुरे गावाजवळ समोरून येणार्‍या दहाचाकी कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कार चक्काचूर होऊन ती खड्ड्यात उलटली. यात सुभाष पाटील व अश्विन पाटील गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
चालक सागर याची प्रकृती स्थिर आहे. पाटील यांचे नातेवाईक संगमेश्वर गावात आले आहेत. मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. रात्री अकराच्या सुमाराला ते तिथून निघाले. कंटेनरचालकावर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.