आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावस्कर निलंबनाचा विषय काँग्रेसच्या समन्वय समितीपुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महानगरपालिकेचे नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्या निलंबनावर कॉंग्रेस पक्ष काय भूमिका घेणार, हे आता समन्वय बैठकीत ठरणार आहे. प्रभाग सातची पोटनिवडणूक झाल्यानंतर कॉंग्रेस निर्णय घेणार आहे. सावस्कर यांना पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी निलंबित करून माहितीस्तव सभागृहापुढे विषय पाठवला. त्यावर सभागृहाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. पण या प्रश्नी दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने सभागृह नेते महेश कोठे यांनी सावध भूमिका घेत कॉंग्रेस पक्षापुढे विषय ठेवला आहे.

समितीत धर्मा भोसले, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, सुधीर खरटमल, महापौर अलका राठोड, महेश कोठे, अँड. यू. एन. बेरिया आदी आहेत.