आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नोकरी सोडून 42 एकरवर साकारले नंदनवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पिवळ्याधमक, गडद लाल, मंद गुलाबी, अशा विविधरंगी झेंडू, जरबेरा फुलांचा मंद सुगंध भातंब्राच्या (ता. बार्शी) माळरानावर दरवळू लागला आहे. उस्मानाबाद शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज डॉ. दत्तात्रय खुणे यांच्या प्रयत्नातून भातंब्राच्या ४२ एकर उजाड माळरानावर नंदनवन साकारले असून, शेतातील फुलांनी दिल्लीसह पुण्या- मुंबईची बाजारपेठ काबीज केली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयातील नोकरी सोडून डॉ. खुणे यांनी स्वीकारलेला आधुनिक शेतीचा मार्ग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून, पाणी, खत, बाजारपेठेचे योग्य नियोजन त्यांच्या यशस्वी शेतीचे गमक आहे.
उस्मानाबादपासून १५ किलोमीटरवर डॉ. खुणे यांची भातंब्रा शिवारात वडिलोपार्जित ४२ एकर जमीन आहे. गेल्या २० वर्षांपासून ते या माळरानात समृध्दीचा मार्ग शोधत होते. त्यांनी ऊसशेती मोडून शेवगा, लिंबू, पपई, झेंडू, जरबेरा, अशी फळझाडे आणि फुलांची लागवड केली. त्यांच्याकडे एकर झेंडू, अर्धा एकर जरबेरा असून, एकर लिंबू, एकर पपई, एकरवर शेवगा आहे.