आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातोडीचा तुकडा गळ्यात घुसून तरुणाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- चिंचोळी एमआयडीसी येथील लोकमंगल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करत असताना हातोडीचा तुकडा तुटून गळ्यात घुसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

अरुण कमरपाल धीमान (वय 20, रा. मुझफ्फर नगर) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. धीमान हा रविवारी दुपारी लोकमंगल कंपनीत काम करत होता. हातोडीने ठोके मारत होता. अचानक हातातील हातोडीचा लोखंडी तुकडा तुटून उडाला आणि तो त्याच्या गळ्याच्या उजव्या बाजूस जाऊन घुसला. यात त्याला गंभीर जखम होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्याला तत्काळ र्शी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.