आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस आंदोलनातील नुकसान भरपाईला हायकोर्टाची स्थगिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - ऊस दर आंदोलनातील सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम वसूल करण्याच्या कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलासा मिळाला आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता हा आदेश दिल्याचा युक्तिवाद मान्य करत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. एच. पाटील व मृदूला भाटकर यांनी या आदेशाला स्थगिती दिली आहे.

गेल्यावर्षी ऊस दराचे आंदोलन पेटल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती. अनेक ठिकाणी टायर जाळून रस्ते अडवण्यात आले होते. याबाबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी जानेवारीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासह 78 कार्यकर्त्यांना 82 लाख रुपयांच्या वसूलीसाठी नोटीस बजावल्या होत्या.

यात शेट्टी यांनाही 1 लाख 12 हजार रुपये भरण्याची नोटीस देण्यात आली होती. शेट्टी यांनी आपल्या उमेदवारीमध्ये तांत्रिक अडचण नको म्हणून हे पैसे भरले. परंतू पंधरा दिवसांपूर्वीच या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.