आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरची आत्महत्या, चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासकीय रुग्णालयातील डॉ. किरण रामभाऊ जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी चार डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विभागप्रमुख डॉ. सुनील घाटे, डॉ. एस. एस. सरवदे, डॉ. निलोफर भोरी, डॉ. सचिन बंदीछोडे अशी त्यांची नावे आहेत. डॉ. जाधव यांचे भाऊ उमेश जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

डॉ. किरण जाधव (वय 29) यांनी शनिवारी सायंकाळी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. डिपार्टमेंटमधील सहका-यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. आपल्या भावाला आत्महत्या करण्यास या चार डॉक्टरांनीच प्रवृत्त केले, असे उमेश जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी रविवारी सायंकाळी कँडल मोर्चा काढला. त्यात 200 डॉक्टर सहभागी झाले होते.