आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारीमध्येच सोलापूरात एप्रिल-मेसारखे ऊन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - फेब्रुवारीनंतर गारठा हद्दपार होतो आणि उन्हाचे अस्तित्त्व जाणवू लागते. यंदा फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यातच उन्हाचे अस्तित्व जाणवत आहे. सूर्याच्या झळा सहनशीलतेच्या पलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे एप्रिल-मेचे ऊन वाटत आहे. तापमानाच्या पार्‍याने रविवारी 34.5 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे रात्री मात्र, गारठा कायम आहे.
किमान तपमान 16.7 अंश सेल्सिअसची नोंद झाली. दोन्ही तापमानामध्ये तब्बल 17.8 अंशांचा फरक होता. शनिवारी कमाल तपमान 35 .1 अंश सेल्सिअस होते. सर्वसाधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा कडाका कमी होऊन उकाड्यात वाढ होते. आता मात्र कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. परिणामी शहरात उन्हाचा कडाका तीव्रतेने जाणवू लागला आहे. सकाळी दहानंतरच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान, कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यांने वर्तवली आहे.
आठवड्यातील चढ-उतार
तारीख कमाल किमान
3 फेब्रुवारी 32.7 15.4
4 फेब्रुवारी 34.5 16.7
5 फेब्रुवारी 34.6 16.1
6 फेब्रुवारी 35.0 17.0
7 फेब्रुवारी 35.7 19.0
8 फेब्रुवारी 35.1 18.2
9 फेब्रुवारी 34.5 16.7