आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Summer Holidays Special Trains Are Not Go By Solapur Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाशांना रेल्वेचा उन्हाळी हंगाम कोरडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उन्हाळ्याच्या सुटीतील विशेष गाड्या सोलापूर स्थानकाऐवजी कुर्डुवाडी आणि दौंडवरून धावत आहेत. त्यामुळे सोलापूरच्या प्रवाशांसाठी हा हंगाम गाड्यांच्याबाबतीत कोरडा गेला आहे. सोलापुरातील यंदा एकच विशेष गाडी सोडण्यात आली. सोलापुरातून उपलब्ध अन्य गाड्यांना प्रतिसाद चांगला असून वेटिंग लिस्ट वाढती आहे.
कोल्हापूर -पूर्णा, पंढरपूर -मिरज, यशवंतपूर -पंढरपूर, पुणे -जबलपूर, कोचिगुडा -शिर्डी या गाड्या विभागातून उन्हाळी विशेष म्हणून धावत आहे. या सर्व गाड्या सोलापूर स्थानकावरून धावता कुर्डुवाडी दौंड स्थानकावरून धावताहेत. यंदाच्या उन्हाळी हंगामात सोलापूर रेल्वे स्थानकावरून एकच गाडी सुरू झाली. सोलापूर ते नागपूर ही गाडी सध्या धावत आहे. त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.
येथून केवळ एकच गाडी असल्याने पुणे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना सध्याही वेटिंगचा सामना करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने नागपूरशिवाय अन्य ठिकाणी अथवा पुणे मुंबईसाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून गाडी सोडली असती तर रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने चांगले झाले असते. केवळ एकच गाडी सोडल्याने रेल्वेचा उन्हाळी हंगाम प्रवाशांसाठी कोरडा गेला आहे.मागच्या वर्षी सोलापूर ते पुणे ही एकच गाडी सोडली होती.
एकच विशेष गाडी
सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त असते. त्यामुळे पुणे मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्यांना दोनशे ते तीनशे प्रवाशांचे रोजचे वेटिंग सुरू असते. उन्हाळ्याच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून रेल्वे प्रशासन काही ठरावीक कालावधीसाठी विशेष गाड्या सोडते. यंदाही एकच गाडी सोलापूर स्थानकावरून सुरू करण्यात आली.
एकेरी मार्गामुळे अडचण
- सोलापूर विभागात दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्या वाढतील. सध्या एकेरी मार्ग असल्याने गाड्या धावणे अवघड बनले आहे.”
के. व्ही. थॉमस, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर