आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग ओकणे सुरूच, पारा ४२.५ अंशावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. चालू उन्हाळातील सर्वाधिक उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची बुधवारी हवामान वेधशाळेत नोंद झाली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे २००५ मधील सर्वोच्च ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाचा उच्चांक यंदा पार केला जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी २९ एप्रिल रोजी सोलापुरात ४३ अंश तापमानाची नोंद झाली होती.
तापमानाचा पारा जसजसा चढू लागला तसतसे दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत.गेल्या आठवड्यापासून सोलापूरचा पारा सातत्याने चाळीशीच्या पुढेच आहे. या वाढत्या तापमानामुळे शहरातील दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासूनच वातावरण तापायला लागते. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, रूमाल गमजा, स्कार्फ परिधान करूनच लोक घराबाहेर पडत आहेत. सकाळी आठपासूनच ऊन्हाचे चटके बसू लागले आहेत.

व्हायरल फिव्हरची लक्षणे
कडाक्याच्याउन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच व्हायरल फिव्हर आणि घसादुखीच्या पेशंटमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. सर्दी, ताप आणि खोकला ही व्हायरल फिव्हरची लक्षणे मुलांमध्ये दिसू लागली आहेत. डॉ.उदय कुलकर्णी
बातम्या आणखी आहेत...