आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर स्पेशल गाड्या फुल्ल, जूनपर्यंत आरक्षण पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- खास उन्हाळी सुटीनिमित्त रेल्वे प्रशासनाने सुरू केलीली सोलापूर -जयपूर व यशवंतपूर-जयपूरला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या गाड्या साप्ताहिक असल्या तरीही अनेकांचा ओढा याच गाडीने प्रवास करण्याकडे आहे. सोलापूर -जयपूर ही गाडी 5 जूनपर्यंत तर यशवंतपूर-जयपूर ही गाडी संपूर्ण जून महिन्यापर्यत फुल्ल झाली आहे.

साप्ताहिक गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असेल तर रेल्वे प्रशासन या गाड्या नियमित करू शकते. सोलापूर -जयपूर (गाडी क्रमांक 09716) ही दर बुधवारी सकाळी 6.45 वाजता निघते. शिर्डी, भोपाळ, उज्जैन, कोटा मार्गे जयपूरला दुसर्‍या दिवशी संध्याकाळी 6.45 वाजता पोहोचते. हीच गाडी (क्रमांक 09715) दर सोमवारी जयपूर स्थानकावरून दुपारी 12.55 वाजता निघते. सोलापूरला बुधवारी पहाटे 2 वाजता पोहोचते.

यशवंतपूर -जयपूर ही गाडी यशवंतपूरहून निघून दर सोमवारी सोलापूरला रात्री 12.15 वाजता येते. वसई रोड, सुरत, अहमदाबाद, माऊंट अबू आदी मार्गे गाडी जयपूरला मंगळवारी पहाटे 3 वाजता पोहचते. गाडी क्रमांक 06512 ही जयपूरहून दर मंगळवारी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी निघते आणि सोलापूरला दुसर्‍या दिवशी सायंकाळी 7.40 वाजता पोहोचते आणि थोडा वेळ थांबा घेऊन यशवंतपूरकडे निघते.