आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunita Raj First Lady Of Ladies Railway Driver In Solapur

सोलापूर विभागात अनिता राज पहिली महिला रेल्वेचालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लहानपणापासूनच वेगळ्या वाटेने आयुष्य जगण्याची अंगी उर्मी, घरी वडिलांचा विरोध असला तरीही त्याची पर्वा करता रेल्वेत दाखल झाली. स्वप्नांना कठीण परिश्रमाची जिद्दीची जोड देऊन ती आज सोलापूर रेल्वे विभागातील पहिली महिला लोको पायलट गुड्स ठरली आहे.
मूळ बिहारची आणि सध्या दौंड येथे कार्यरत असलेली अनिता राज. बिहारमधील सहारसा जिल्हातील सुखासन हे गाव. अनिता राजने वयाच्या १४ व्या वर्षी टीव्हीवर भारताची पहिली महिला लोको पायलट ठरलेल्या सुरेखा यादव (भोसले) यांची मुलाखत पाहिली. या मुलाखतीचा अनितावर प्रभाव पडला. आपल्यालाही रेल्वेचा चालक बनायचं असल्याची खूणगाठ मनाशी बांधून तिचा प्रवास सुरू झाला. अनिता राजने २००७ मध्ये इलाहाबाद येथून रेल्वेची परीक्षा दिली. त्यात ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिची बदली मध्य रेल्वेत झाली.
प्रशिक्षणानंतर सहाय्यक लोको पायलट म्हणून तिने काम करण्यास सुरुवात केली. सहाय्यक लोको पायलट म्हणून तिने जवळपास ७५ हजार किमीपर्यंत रेल्वे चालवली. अनुभव आल्यानंतर ती आता मालगाडीची चालक होण्यासाठी सज्ज झाली आहे. मालगाडीची चालक झालेली ती सोलापूर रेल्वे विभागातील पहिली महिला ठरली आहे. यानंतर तिला टप्प्याटप्प्याने मेल, एक्सप्रेस चालवण्याची संधी दिली जाणार आहे.

^ अनिताराज ही सोलापूर विभागातील पहिली महिला लोको पायलट असल्याने तिचा आम्हाला अभिमान आहे. सोलापूर विभागात जवळपास ५०० लोको पायलट आहेत. या क्षेत्रात पुरुष कर्मचारी जास्त आहेत. असे असताना तिने महिला म्हणून दाखवलेले धाडस हे उल्लेखनीयच म्हणावे लागेल. शिवाजीकदम , वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता.

^महिलांसमोर आज या क्षेत्रात आव्हाने जरी असली तरीही मी समर्थपणे तोंड देईन. यात मला माझ्या पतीचे खूप सहकार्य लाभते. अनिताराज , महिला रेल्वे चालक. (लोको पायलट)

आता डिझेलसोबत इलेक्ट्रिक इंजिन चालवणार
डिझेलवर धावणाऱ्या इंजिनचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तिला नुकतेच इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या इंजिनचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोलापूर रेल्वे विभागात सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर सोलापूर विभागातील गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहे. अनिता राज आपल्या कामात अधिक पारंगत व्हावी म्हणून तिला आता सोलापूर -वाडी या सेक्शनमध्ये काम करण्यास सांगितले आहे.
मालगाडी चालकांपुढची आव्हाने एकामालगाडीत जवळपास हजार २०० टन माल असतो. प्रवासी गाड्यांचे वजन तुलनेने खूप कमी असते. मालगाडीमध्ये जवळपास ५४ वॅगन असतात. त्याची लांबी ७०० मीटर लांब असते. त्यामुळे वळणावर, घाटात, चढ-उतारावर गाडी चालवणे कठीण असते. खूप वेळा पॅसेंजर गाड्यांना आउटरवर थांबवून ठेवण्यात येते. कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक नसते. बऱ्याचदा १२ ते १४ तास पॅसेंजरच्या चालकांना ड्यूटी करावी लागते. मालगाडीत स्वच्छतागृह नसते. त्यामुळे चालकाची विशेष करून महिला चालकांची गैरसोय होते.