आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर स्पेशालिटीबद्दल ठोस निर्णय न देताच परतले आरोग्यमंत्री गावित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘आयसीयू’, ‘एमआरआय’, ‘बर्न वार्ड’ व ‘ट्रामा केअर युनिट’ यांची मान्यता 15 ऑगस्टपर्यंत देण्यात येईल. प्राध्यापक, निवासी डॉक्टर, तृतीय र्शेणी कर्मचारी व चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांची रिक्त पदे येत्या 15 जुलैपर्यंत भरण्यात येतील, असे आश्वासन आरोग्य मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी रविवारी येथे दिले.

ते सोलापूर दौर्‍यावर असून, सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील समस्यांबाबत शासकीय महाविद्यालयात बैठक झाली. तीत दोन तास चर्चा चालली. सरकारकडे पैसा नसल्याचे त्यांनी सांगितल्याने सुपर स्पेशालिटी दवाखान्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

बैठकीस अधिष्ठाता व मेडिकल कौन्सिलचे सदस्य होते. आमदार प्रणिती शिंदे यांनीही समस्या मांडल्या. सायंकाळी सहाला आलेल्या गावितांसाठी रविवारी दिवसभर महाविद्यालय सुरू होते. नियोजनाप्रमाणे ते दुपारी दोनला येणार होते. प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी यांना रात्री आठ वाजेपर्यंत थांबावे लागले.

‘दिव्य मराठी’ची दखल
‘दिव्य मराठी’ने ‘डीबी स्टार’मध्ये ओपीडीची संख्या घटली, यावर गावित यांनी दालनात आल्यानंतर प्रथम प्रश्न ओपीडीबद्दल अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्याकडे विचारणा केली. याबाबत सर्व अधिकार्‍यांना याचा जाब विचारला. ओपीडी घटण्यामागणी कारणे अधिष्ठातांनी शोधावी, असेही गावित यांनी सांगितले.

पाठपुरावा करतच राहू
विजयकुमार गावित यांच्यापुढे सिव्हिल समस्यांबाबत व सुपर स्पेशालिटीचा पाठपुरावा करतच राहणार आहे. त्यासाठी केंद्र स्तरावरून पाठपुरावा करणार आहे. गावित यांनी येत्या 15 ऑगस्टपर्यंत रिक्त पदे व आयसीयू, बर्न वॉर्ड, ट्रामा केअर, ब्लड कंपोनंटला मान्यता देण्याचे सांगितले आहे.’’ प्रणिती शिंदे, आमदार