आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supplementary Exam Chance Cancelled By Solapur Univiresity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्चचा विषय ऑक्टोबरमध्ये काढण्याची संधी संपली, वाट पाहा वर्षाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाने परीक्षा घेण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. नेहमीप्रमाणे वर्षातून दोनदा परीक्षा होतील. मात्र, त्या सर्व सत्रांच्या असणार नाहीत. यामुळे पुन:परीक्षार्थींना फटका बसणार आहे. त्यांचा एखादा विषय राहिल्यास त्याची परीक्षा देण्यासाठी वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा परीक्षा विभागाच्या यंत्रणेवरील ताण सैल करण्यासाठी हा निर्णय अंमलात आल्याची चर्चा आहे.

ऑक्टोबरमध्ये पहिल्या व तिसर्‍या तर मार्चमध्ये दुसर्‍या व तिसर्‍या सत्राची परीक्षा होईल. पाचव्या व सहाव्या सत्राची परीक्षा दोन्ही महिन्यांत कायम ठेवल्या आहेत. हा बदल चालू वर्षापासून लागू झाला आहे. यातून अभियांत्रिकी व कायदा अभ्यासक्रमास वगळले आहे. विद्या परिषदेने 20 एप्रिल रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता.

परीक्षांचे असे असतील सत्र
पदवी अभ्यासक्रम : ऑक्टोबरमध्ये 1, 3, 5 व 6, मार्चमध्ये 2, 4, 5 व 6
पदव्युत्तर अभ्यासक्रम : ऑक्टोबरमध्ये 1, 3 व 5, मार्चमध्ये 2, 4 व 5

यंदापासून लागू
विद्या परिषदेतील धोरणात्मक निर्णयानुसार बदल करण्यात आला. तो यंदापासून लागू होत आहे. अभियांत्रिकी व कायदा अभ्यासक्रमास यातून वगळण्यात आले आहे.’’ डॉ. दादासाहेब साळुंखे, परीक्षा नियंत्रक
विद्यार्थ्यांवर दडपण
परीक्षा पद्धतीतील या बदलामुळे विद्यार्थ्यांवर संपूर्ण वर्ष दडपण राहील. सत्र पद्धती असल्याने ऑक्टोबरमधील राहिलेला विषय मार्च मध्ये सोडविण्याची संधी मिळावी. ’’ दत्ता चव्हाण , एसएफआय