आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांना फुटला घाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सकाळी साडेआठची वेळ. स्थळ सिद्धरामेश्वर मंदिर. नेत्याची पावले झपझप पडतात. त्यांच्या मागोमाग मंत्री, उपनेते व कार्यकर्ते यांची धावपळ. नेत्याची गती साधण्याच्या प्रयत्नाने त्यांची दमछाक आणि घाम फुटलेला. हे वर्णन आहे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मंदिर भेटीच्या प्रसंगाचे.
सौ. सुळे यांच्या वक्तशीरपणाची माहिती असल्याने प्रमुख नेते वेळेवर हजर होते. मात्र, याची माहिती नसलेल्या नवख्यांची पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे सकाळी आठला त्या हजर होत्या. मंदिराची पाहणी केली. दर्शन घेतले. मंदिर समितीचा सत्कार लांबत असल्याचे दिसताच सौ. सुळे पुढे झाल्या आणि उभ्याने हारतुरे स्वीकारले. ‘चलो जल्दी, हमें काम करना है, सत्कारोंमे ज्यादा वक्त नही जाया करना चाहीए’ असे म्हणत खुच्र्या बाजूला सारत त्या पुढे निघाल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांची धावपळ झाली.
कधीही न पळणारे नेते घामेघूम झाले. पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक साळुंखे, उपमहापौर हारून सय्यद, जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, शहराध्यक्ष महेश गादेकर, जिल्हा युवक अध्यक्ष संतोष पवार, शहर युवक अध्यक्ष किसन जाधव, माजी महापौर जनार्दन कारमपुरी आदी उपस्थित होते.