आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतींचा मेळावा : राज्यात सक्षम महिला नेतृत्व देणार : सुप्रिया सुळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यातील महिलांचे अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या शौचालयासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार 20 लाखांचा निधी देईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असल्यानेच युवती अभियान सुरू केले आहे. राष्ट्रवादी भविष्यात महिलांमधून चांगले नेतृत्व देईल. मी राज्यापेक्षा दिल्लीतच जास्त रमते, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी केले.
राष्ट्रवादी युवती मेळाव्यासाठी मंगळवारी सोलापुरात आलेल्या खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्या म्हणाल्या की, ‘युवती अभियानाची निमंत्रक म्हणून राज्याचा दौरा करीत आहे. 50 टक्के महिला आरक्षण झाले; पण राजकारणात महिला दिसत नाहीत, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे हे अभियान पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. 28 आॅक्टोबरला औरंगाबाद येथे या अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता होणार आहे. या वेळी अभियानाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. स्त्री भ्रूणहत्या, शौचालय, वसतिगृह, क्रीडांगण, शिष्यवृत्ती, छेडछाड, हुंडा, सुरक्षा, बस व एसटीची सुविधा, नोकरी, समान कायदा असे महिलांविषयी अनेक प्रश्न आहेत. राज्यात सर्व कुशल-मंगल आहे असे मी म्हणणार नाही. राज्यातील बसस्थानकांत महिलांसाठीही पुरेशी शौचालये नसून असलेली खूपच अस्वच्छ असल्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे सुळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
राज्याला महिला मुख्यमंत्री देण्यासाठी राष्ट्रवादी पुढाकार घेईल का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘हा निर्णय शरद पवार आणि आमदार घेतील. मी राज्यापेक्षा दिल्लीत जास्त रमते. 2029 पर्यंत मी बारामती लोकसभा मतदारसंघातूनच तिकीट मागणार आहे,’ असे स्पष्ट करीत सध्या तरी मुख्यमंत्री होण्याचा आपला विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझीही छेडछाड- मुली व युवतींची छेडछाड होते. याचा अर्थ राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असा होत नाही. छेडछाडीचा विषय खूप जुना व सामाजिक आहे. कॉलेजमध्ये असताना माझीही छेडछाड झाली होती, अशी आठवणही सुप्रिया सुळे यांनी सांगितली.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी वर्षभरानंतर - सुप्रिया सुळे
मुलींची छेड रोखण्यासाठी हेल्पलाइन : सुप्रिया सुळे
राजकारणात प्रशिक्षित महिलांना आणणार; खासदार सुळे यांचा विश्वास
केंद्रातच काम करणार : सुप्रिया सुळे